Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२ ) त्याची दौलत फारच वाढली. त्याने निरनिराळ्या चार कंपन्या स्थापन केल्या. आणि एका दिवसांत त्यानें पंध्रा लक्ष पौंड भांडवल जमविलें ! ! ! हा गृहस्थ दक्षिण अफ्रिकेतील पहिला कोटयाधिश होय. दी. विअर्स या नांवची एक खाण तिचे उतन्न प्रत्येक मिनिटास तीन पौंड आहे. मग तिचा मालक केवढा धनाढ्य असेल हा विचार तुझींच करा. त्या देशांत सोनें सांपडते असे समजले तेव्हां तेथें मि. रा. विनसन या नांवच्या एका तरुणानें जी खाण सात हजार पौंड देऊन खरेदी घेतली तिची किंमत भाज इतकी वाढली आहे की, जगांतील सोन्याचे खाणीत तिचा पहिला नंबर आहे ह्मणजे तसें चांगले व विपूल सोनें दुसऱ्या कोणत्याही खाणीत सांपडत नाहीं. किंवरली येथील हिण्याची खाण खरेदी घेतांना त्या जाग्याच्या मालकास देण्याकरतां दी. विअर्स कंप- नीनें पहिल्याच तडाक्यास पंचावन लक्ष पौंडाचा चेक भरून दिला !! कित्येक दिवस त्या आश्चर्यकारक चेकाचा नमुना किंबरलीच्या वाजारांत विकत होता. निरनिराळ्या कंपन्या आपल्या तैनातीतील मजुरास नो रोजमुरा देतात त्याला दरसाल चाळीसलक्ष पौंड खर्ची पडतात. गेल्या तीस वर्षीत तेथून दहा कोटी पौंडांचे हिरे बाह्य प्रदेशी गेले. दी. विअर्सच्या चार खाणींचा विस्तार एकशेचारा एकर आहे. त्यांत काफीलोक मजूरदारीनें काम करतात. आतां प्रश्न इतकाच आहे की, ही खाण आणखी