( २१४ ) बनला तरी त्यास याचेंच साह्य पाहिजे लागते आणि नित्रनतेलाही हा लत्र कारणीभूत आहे. या लचा लख- लखाट वाचकांचे उत्तमप्रकारें मनोरंजन करील अर्से जागून त्या संबंधानें थोडासा ललकार करितों. लोकहो, आपण चांगल्या मार्गानें जाता ह्मणून तर ह्या मेदिनीतलावर आपला लौकिक गाजत आहे. आडमार्गाने जाण्याचे मनांत आणाल तर सर्व काम लंगडें पडून आप्तइष्टांचा लगा तुटेल व त्या योगार्ने लहानपण प्राप्त होऊन एकावर एक लचांडे उभी राह- तील. कोणी जवळमुद्धां करत नाहीं अशी स्थिती प्राप्त झाली ह्मणजे लज्जेने म्लान मुख होत्साता भणग लोकांनीं पूज्य मानलेल्या लंगोटीचा आश्रय करावा लागेल व त्या योगाने जगांत लटका बोभाटा होऊन लगतचे मित्रवर्य लक्ष्मीअलंकृत असले तरी आपल्या उपयोगी न पडतां लंबनाशी प्रसंग येईल. तसेच या प्रपंचांत लग्न जर मुळींच न जाहले तर ललनासौख्य तर सोडा पण लटपट केली तरी लठ्ठ निरंजनाला लंडी समजून श्री विष्णुपत्नी लक्ष्मी- सुद्धां लभ्य होणार नाहीं. अर्थातच मग अशा मनुष्या बरोबर व्यवाहार करावा असे कोणा अजाणाच्या सुद्धां लक्षांत न येतां लवाड असे जाणून प्रत्येका कडून चपराकींचा मात्र लाभ होणार आहे. मग लडाट रेपेला बोल लावून किंवा लगतच्या लोकांवर क्रद्ध होऊन लगबगीनें शुद्धिवर
पान:लोकमित्र १९००.pdf/२१४
Appearance