Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१२ ) करून तो ह्मणाला " महाराज ! तुह्मांस जे चांगले दिसेल तें तें तुह्मी निर्भयतनें करा. मी तुमच्या परमवंद्य पदकम लांची शपथ वाहून सांगतों कीं, तुझी निःशंक जय- सिंहास गादीवर बसवा. राज्यलोमानें तुमचें मन खिन्न करावें; तुझीं जिवंत असतांना किंवा तुमचेपश्चात जय- सिंहास त्रास द्यावा असे बिलकूल माझे मनांत नाहीं. समयी माझे दैववैचित्र्यानें मीं सांगतों हें तुह्मांस खरें वाटत नसेल तर भगवान एकलिंगाची शपथ घेऊन मीं अशी प्रतिज्ञा करतों कीं, आमरण मी तुमच्या राज्य- सीमेंत पाणीदेखील पिणार नाहीं आणि पिईन तर निसंशय तुमचे वीर्याचा नव्हे ! " असे सांगून भीमसिं- मानें आपल्या लोकांस बरावर घेतले आणि त्या ध्रुव- पराक्रम संपन्नानें निकडे आपला भाग्योदयहोईल तिकडे जावें असा मनांत दृढनिश्चय केला. वय भीमसिंह उदयपूर सोडून निघाला तेव्हां त्याचें विशेषहोते असा अर्थ नाहीं. परंतु कालाच्या विचित्रगतीप्रमाणे त्यास देशबहिष्कार समय आला ! ज्यादिवसीं तो निघाला त्यादिवसीं ऊन फार कडक होतें. वारा अग्निप्रमाणे वहात होता. उन्हाच्या त्रासामुळे व परिश्रमामुळे तो फारच थकला. राज्याच्या सीमांत प्रदेशांत विश्रांति घेण्याकरितां तो एका वट वृक्ष छायेस बसला. त्याच्या आंगांतून धर्माचा पूर निघाला. तृपेनें प्राण व्याकुळ झाले. इतक्यांत खिजमतगारानें जवळच्या झज्यांतून रुप्याचा प्याला थंडगार अमृतोदकानें भरून त्याच्या हातीं दिला. भीमसिंह तृषार्त होताच. त्यास तें स्वच्छ शीतोदक पहातांच प्यावें अशी साहजिक