Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २११ ) नाच्या व मागून मोठ्याच्या हातीं बांधिली. जमलेल्या सभ्यांस राजाच्या विस्मरणाचें आश्चर्य वाटलें. परंतु कोणीच कांहीं बोलेना. असो. दिवसेंदिवस लहान मुला- वर राण्याची फार प्रीति बसली आणि आपल्यापश्चात सर्व राज्यभार कनिष्ट पुत्रावर सोंपवावा असा ही त्याचा दृढ निश्चय झाला. भीम- एकदां राजसिंहाने शत्रुप्राणघातक जाज्वल्य तर- वार म्यानांतून सणूकन बाहेर काढिली आणि पराक्रम भीमसिंहाच्या हाती देऊन सांगितलें, " भीमसिंह पुढे तूं जयसिंहाचा शत्रु होणार. समयीं माझ्यापश्चात राजसिंहासनास धक्का बसणार. त्या- पेक्षां आज हा जयसिंह आणि ही तलवार तुझ्या पुढे तयार आहे. तुला में योग्य वाटेल तें खुशाल कर. मी जिवंतअसतांना किंवा परलोकी गेल्यानंतर तुह्मीं राज्याकरितां आपसांत भांडावें. आणि औरंग- जेवासारख्या अधमाधमानें आमचें राज्य बळकावून आमचे हाल करावे. त्यापेक्षां तुला राज्याभिलाषा असेल तर तूं आपल्या कनिष्ट बंधुच्या मानेवर आतां माझ्यासमक्ष तरवार मार. माझी जयसिंहावर फार प्रीति आहे हें सर्वोस माहीत आहे. भावि अशुभचिन्हां वरून मला जे विचार आज सुचले ते तुला स्पष्ट सांगितले. यांत तुला जो योग्य मार्ग दिसेल तो तूं निर्धास्तपणें घर. कहे पित्याच्या तोंडचे कठोर शब्द ऐकतांच सिंहविक्रम भीमसिंह चकित झाला. कांहीवेळ शांतमनानें विचार-