Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०९ ) नुकताच थोडासा पाऊस पडून गेला होता. माद्र- पदाचा महिना असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवेंचार गवत उगवले होतें. हरीभाऊ दगडावर बसून सभों- वतालचे श्रृष्टिसौंदर्य अवलोकन करित होते, तथापि त्यांचे मन त्या मोहक देखाव्याकडे लागेना ! सकाळच्या त्या कठोर वाग्बाणांचीं तीं अग्रे त्यांच्या हृदयास एकसा- रखीं टोचत होतीं. अशा स्थितीत ते कांहीवेळ अगदी स्तब्ध बसले असतां एकाएकी घाबरल्यासारखे होऊन उठले व त्या दगडापासून दोन हातांच्या अंतरावर जाऊन त्या काळ्या पाषाणाकडे टक लावून पाहू लागले. एक मोठा दुःखाचा सुस्कारा टाकून ते म्हणाले या काळ्या दगडाचा चारच बोटे तुकडा कोणी कशाकरितां काढिला असावा बरें ! ! इतक्यांत त्या दगडांतून त्यास असे बोलणे ऐकू आलें. “हे ब्राम्हणा ! ब्रम्हदेव जेव्हां दुर्जनास या जगांत सज्जनांनां दुःख देण्याकरितां उत्पन्न करितो, तेव्हां मजसारख्या काळ्या व कठिण दगडाच्या एका तुकड्याचे त्याचें हृदय घडवित असतो !! मी आज हजारों वर्षे या ठिकाणी आहे. हजारों पावसाळे मला भिजवून गेले असतील ! परंतु माझ्यांत एक रतिमात्र कमीपणा झाला नाहीं !!! यावरून तूं काय ते समज !" • हरीभाऊ मनांत समजले व पुढील कार्याचा काय निश्चय करावयाचा तो आपल्या मनासीं करित करित नित्य क्रमाप्रमाणे एका राममंदिरांत येऊन देवदर्श नानंतर पुराण श्रवणास बसले !