( २०६ ) विणूं लागले; पण ती त्यावेळी फारच महाग विकत. इतकी की त्याची किंमत त्याचे भारोभार सोने ही होती ! म्हणून मोठमोठे श्रीमंत लोक किंवा राजेरन- वाडे यांत मात्र तीं प्राप्त होत. रेशीम कसे उत्पन्न करितात, हे त्यावेळी चिनी लोकां- शिवाय इतर लोकांस मुळींच माहीत नव्हते. ती कृति पहावी ह्मणून बऱ्याच राजांनी आपल्या पदरचे कांहीं हुषार लोक चिनांत पाठवून, चिनी लोकांची ही अजब कला साध्य व्हावी ह्मणून खटस्ट केली; परंतु त्या लो- कांनी त्यांची डाळ शिजूं दिली नाही. परंतु पर्शियाचे बा दशहाचे वतीनें, मिशनरी लोक बेराग्याचे वेपार्ने चिनांत येऊन, त्यांनी रेशीम उत्पन्न करण्याची कला, व तिज-- बरोबर रेशमी किड्यांचीं अंडीं स्वदेशी नेलीं व तेव्हां- पासून त्या लोकांस रेशमाची माहिती होऊन, तेथें रेशमी वस्त्रे तयार होऊं लागलीं. रेशमी किड्यांत दोन जाती असतात. जी जात पांढरी असते ती तांबर्डे रेशीम तयार करते व दुसरी पांढरें तयार करिते. सरासरी १०५०० कोसले असले तर त्यांपासून एक पौंड रेशीम निघतें. फ्रेंच लोकांनी शास्त्रीय रीतिनें पाळिलेले किड्यांची जी जात, त्या जातीचे २५०० कोसले घेतले तर त्यांपासूनही तितकेंच ह्मणजे एक पौंड रेशीम निघते. किड्यांनी कोसला तयार केला ह्मणने ते कोसले गोळा करून आणितात व आधण आलेल्या पाण्यांत टाकितात. नंतर त्यांजपासून रेशमाचे धागे सोडवून काढितात.
पान:लोकमित्र १९००.pdf/२०६
Appearance