Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०३ ) मदन- दूति तुला ह्मणती कुणी । कुणि तुला ह्मणती कल भाविणी ॥ त्वरित भेटवि ती रमणी मला । हरिल जी मम या विरहानला ॥ ३ ॥ मधुर-कोमल-कांत तुझा रव । मनि उदासिनता करितो नव ! ॥ मदन-मार्गण पीडित संतत । मुळिच सौख्य नतें गृहिं वाटत ! ॥ ४ ॥ तव रवांसि अगम्यचि सुंदरी ? | कथिच वा मम तूं वच नाहरी ॥ जरि असे; अबला खलु मानिनी । नर-घृणा नच त्यां वसते मनी ! ॥ ५ ॥ गुणसमत्व दिसे तुमच्या स्वरीं । हणुनि मत्सर-भाव हदीं धरी । मजगमे:- जरि है असले खरें । कवण दुःस्र मदीय अगे हरे ? ॥ ६ ॥ 'आशा' - आशे मुळे चालति सर्व कामे । कोणी मुळी राहति ना रिकामे ॥ आशा खरें जीवित मानवांचें । नाहीं तरी निष्फल सर्व साचें ॥ १ ॥