Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२००) लागलों. परंतु ती नाहींशी झाली असें दिसल्यावरून माझ्या दुःखाची परमावधी झाली. या दृष्टांतापासून मी आतां एवढे मात्र शिकलों की कोणत्याही वस्तुची खरी मित तिच्या चांगल्या अथवा वाईट बाह्यस्वरूपावरून मुळीच होत नाहीं; आणि बाह्य स्वरूपावरूनच तिची स्पृहा करणें, किंवा तिरस्कार करणे हें मौर्य होय. इतकेंच. दिव्य भूमी. लोक "भुजंग प्रयात" कुठें श्रेष्ट भूमी असे सांग माते कथा रम्य जेथील तूं नित्य मातें ॥ कथोनी मनाया बहुतष्ट केलें । मही ती पछाया मन हें भुकेलें ॥ १ ॥ जिथें रम्य पुष्पें प्रकाशे फुलोनी । सुशोभित उद्यान तैसे करोनी ॥ सद श्रांत चित्ता बहू सौख्य देती । तिथें कां असे सांग धन्या मही ती ॥ २ ॥ जिथे चुंबिती व्योम ताडादि झाडें । जिथे नित्य ती वीज किंवा कडाडे !! जिथे पक्क ताज्या मधू खर्जुरीका | तिथे सांग माते कही ती असे कां ॥ ३ ॥ दिसे लेचना व्योम जें उंच भारीं । जिये पक्षि घंती मजेनें भरारी ।।