( १९८ ) लागणाऱ्या, शक्ति, श्रीमंती, सुदैव, आणि अशाच दुस- या कित्येक वजनापेक्षां अत्यंत भारी भरलें ! आपल्यांत " पुस्तकाध्ययनापेक्षां स्वाभाविक बुद्धी श्रेष्ट " अशी जी ह्मण आहे तिची सत्यता मला या वर निर्दिष्ट केलेल्या दोन वस्तुंची ' तुर्खेत तुलना करून पाहतां प्रत्ययास आली. या दोन वस्तूंच्या वजनांच्या प्रयोगानंतर मला एक नूतनच शोध लागला ह्मणायचा. कारण पुस्तकाध्ययनाच्या वजनापेक्षां स्वाभाविक बुद्धीचें वजन गुरुतर असतांहि मला असे आढळून आले की, त्या दोनी वस्तू एकाच पारड्यांत घातल्या असतांना बुद्धिचें वजन पहिल्यापेक्षां एकदम शतपट अधीक भरलें यावरून सिद्ध होतें कीं, पुस्तकाध्ययनाचा आणि नैस- र्गिक बुद्धिचा जेव्हां सुदैवानें संयोग होतो, तेव्हां बुद्धिचें वैभव अनिर्वचनीय होते ! हाच प्रयोग मीं नीति आणि आस्तिक्य यांविषयीं करून पाहिला. कारण निरनिराळे वजन केलें अतां नीतिचें वजन जास्त भरले असतांही नीति आणि आस्तिक्य यांचे एकदम वजन करितांना नीति पूर्वीपेक्षा, संयोगानं- तर, अवर्णनीय गुरुत्व पावली!! हाच विचक्षण चमत्कार मला दुसऱ्या कित्येक प्रयोगांत आढळून आला. उदाह रणार्थ बुद्धि आणि निर्णय, तत्व आणि धर्म, न्याय आणि दयार्दता, अनुराग आणि औदार्य, गांभीर्य आणि ज्ञान आणि अशाच प्रकारच्यापुष्कळ प्रयोगांतून वरील. आश्चर्यजनक शोधाची सत्यता कळून आली. निद्रेच्या आधीन झाल्यावर स्वप्नांत मानवी कल्पनेत काय काय चमत्कार घडतात ! कांहीं कळत नाहीं.
पान:लोकमित्र १९००.pdf/१९८
Appearance