Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९७ ) वैभव, यातना, संपदा, विपत्ती, रमणीयता, विजय आणि नुसत्या हातास अत्यंत गुरु लागणारी कित्येक वजनें टाकिलीं तरीहि पहिले पारर्डे स्वस्थानाहून किंचितही ढळलें नाहीं. अनुभवांनी हे सिद्ध झालें कीं, दुसऱ्या पारड्यांत जरी रवि, सकल तसंगण आणि पृथ्वी यांचीही वजनें टाकिली असती तरीही तोच परिणाम दृग्गोचर होता ! , नंतर दोनी पारडी रिकामी केली. आणि त्यांपैकी एकांत बहुविध पदव्या, सन्मान, डामडौल, विजय आणि दुसरींहि अशाच प्रकारची कित्येक वजर्ने टाकून जव- ळच पडलेले एक चमकणारें लहानसें वजन दुसऱ्यांत टाकिलें. असे करितांच आश्चर्य की दोन्हीं पारडीं सम- तोल राहिली! त्या लहानशा खद्योतवत् चमकणाऱ्या वजनावर ' पोकळपणा' हीं अक्षरें कोरलेली होती ! याचप्रमाणे त्या राशीत सारख्या आकृतीचीं अनेक वजने माझ्या दृष्टीस पडली आणि तीं परस्परांप्त तोलून धरितील असे सक़द्दर्शनीं वाटे पण पारड्यांत पडतांच त्यांची वजने अगदीच विसंगत होत! केवढें आश्चर्य ! तद्नंतर एका विविक्षित वजनाकडे माझी व्यालोल दृष्टी वळली. त्या वजनांच्या दोहोंबाजूवर कांहीं हिले आहे हे मला दिसून आलें. सूक्ष्मावलोकनानंतर एका बाजूवर मानवी लिपीत कांहीं लिहिलेलें आणि पाय- थ्याशीं ' चिरतंन दुःख ' ही अक्षरें आढळली. दुसरी- वर देवलिपीत कांही लिहिलेले आणि पायथ्याशीं 'ब्रह्मा- नंद ' हीं अक्षरें विराजित होती. या अलौकिक वज नाची नैसर्गिक किंमत अत्यंत मोडी आहे हे मला कळून आलें. कारण हे वजन नुसत्या हातास फारच जड