( १९५ ) पापकर्मी, चांडाळ आणि दुराचारी समजला पाहिजे की जो तुझ्या कृपेपासून सकारण अथवा अकारण दूर रहातो. ज्याला रात्रीं तूं आपल्या कोमल बाहूंनी . सरभसालिंगन दिलें नाहींस त्याला पहाटेची अनिर्वचनीय शोभा कशी आनंद देईल ? गाढ निद्रा अनुभवलेल्या दैवशाली व्यक्तींचा हर्ष त्याला कोठून. धन्य तुझी ! माझी प्रार्थना कीं, निद्रे - "लागे तु ज्यास कधीं न वारें ॥ ईशा तयाला पदरीं घरीरे ” ॥ नाहींतर व्यर्थ त्याचें जन्म. निद्रावश झाल्यावर मला एक फारच विलक्षण दृष्टांत पडला तो असाः- मी आपल्या आरामखुर्चीवर बसून हातांत पुस्तक घेऊन वाचीत आहे. मेणबत्तीचा शांत आणि आनंददा- यक प्रकाश माझ्या वाचनमंदीरास शोभवीत आहे. कांहीं पुस्तकें इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडली आहेत. वाचता वाचतां अगणित विषयावर विचार करण्यांत मीं अगढ़ी गर्क झालो आहे. कित्येक विषयांचें स्मरण करितां करितां मीं स्वाभविक रीतीनें नीतिविषयक विषयांकडे वळलों. सद्गुग आणि दुर्गुण यांच्या नैस- र्गिक तत्वांचा आणि निद्रावश होण्याच्या आधी ' सैतान, तुला, ' इत्यादि विषयांचा कांहीं अंतर्गत संबंध आहे. असे मला वाटलें. सण आणि दुर्गुण यांच्या मूळतत्वाविषयी पुष्कळ तऱ्हेनें विचार करीत असतां माझी दृष्टि एकदम एका नयनमनोहर अशा ' सुवर्ण तुले ' कडे गेली. तिच्या दांडीस दोन्हीबाजूस सुवर्णाचीं केलेलीं त्याच धातूच्या शृंखलेनें अटकविलेली
पान:लोकमित्र १९००.pdf/१९५
Appearance