( १९४ ) त्या रात्री नित्यापेक्षां अभ्यास जास्त केल्याने झोपची गुंगी चांगलीशी निघाली नव्हती. अभ्यासास प्रारंभ करून सरासरी पंधरा वीस मिनिटें कविकुलगुरू कालि दास प्रणित शाकुंतलाचा प्रथमसर्ग वाचल्यावर आंग्ल कविश्रेष्ठ मिल्टनच्या प्याराडाईज् लॉस्त पुस्तक चवर्थे यांतील शेवटचा भाग वाचण्यास आरंभ केला. वाचतां वाचतां “ The Fiend looked up and Knew his mounted seile aloft. " इथपर्यंत वाचीत आलों या कथानकाचे स्वरूप, कवितेतील बहुविध अलंकार आणि अर्थ सौरस्य इत्यादिकांनी कविविषयी माझे मनांत अतिशय पूज्यबुद्धी उत्पन्न केली. 'सैतान ' ती 'तुला' त्याचे ते ' वर जाणे ! वाहवा ! आश्चर्यच! मीं तर अगदींच आश्चर्यचकीत झालों ! आणि कांहीवेळ हातांतील पुस्तक मिटून आपल्याशीच विचार करूं- लागलों. रत्रीं जास्तवेळ जागल्यामुळे अमळ आळस- ल्यासारखाही झालो. असो. जो जो जास्त विचार करूं लागलों तो अधिकाधिक कल्पना माझ्या मनांत येऊं लागल्या. मनाची एकाग्रताही अमळ मागेंपाहू लागली ! याप्रमार्गे, 'तुला ' इत्यादिकांचा विचार करितांना मनाची चलचिंचल होऊन थोडासा घोटाळल्या सारखा झाले. माझी ही स्थिती पाहून निद्रा-सखीनें मला कळं न देतां मंद मंद पावलांनी मजजवळ येऊन अग दींच पराधीन केलें. निद्रे ! तं कितीतरी मनोहर आहेस! तुझी सृष्टि- नियमाप्रमाणे सकल जीवलोकांवर होणारी कृपा ना त्यांच्या प्रासार्थक वाटायला लावते. तो अभागी,
पान:लोकमित्र १९००.pdf/१९४
Appearance