Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जून. लोकमित्र. विलक्षण दृष्टांत. WOW:C शाळेची परीक्षा अगदी समीप येत चालल्यामुळे अभ्यासांत नेहमीपेक्षां थोडावेळ जास्त खर्च करणे भाग- पडे. सर्भोवतालच्या घरांतील सर्व माणसें निद्रावश झाल्यामुळे शांतता जिकडे तिकडे स्वैरविहार करीत फिरूं लागल्यावर मी रात्रीं आपले पुस्तक बंद करीं. वेळ बराच झाल्यामुळे झोप तेव्हांच येई. पुनःही रात्र उलटून गेल्यावर प्रभातसमय जसजसा जवळ येऊंलागे तसतसी निद्रा विशेष अम्मल करी. जवळच्या पुष्पवा- टिके वरून मंदमंद वहात आल्यामुळे घ्राणेंद्रियास तृप्त करणाऱ्या शीतळ आणि सौगंध्ययुक्त वायुचें सहाय घेऊन निद्रा आपले दुर्जयत्व मोठ्या चातुर्याने प्रकट करी! तरीही परीक्षेत पास होऊन ' डिग्री ' मिळवि- ●ण्याची हौस ह्मणा किंवा अभ्यासाची काळजी ह्मणा कोणत्यातरी कारणानें मी नित्य बरोबर चार वाजतां जागा होई, याप्रमाणे बरेच दिवस क्रम चालून पहाटेच्या सुशांत वेळेत अभ्यासही बरा होऊं लागला. एकेंदिवशीं नित्याप्रमाणें शुक्रोदयीं जागा होऊन डोळ्यांस पाणी वगैरे लावल्यानंतर अभ्यासास लागलों.