- अशाच प्रकारच्या अन्य वरगना करावयाच्या त्यांस एकदां आशेने गांठिले ह्मणने त्यांचे पोपटी ब्रह्मज्ञान क्षणार्धीत कसे लटपट पहा ! मनुष्यमात्राच्या - मग तें सूज्ञ असो अथवा अज्ञ अप्सो- अंतरांत आशास्वरूप पिशाच्याने एकदां काईमचा संचार केला झणजे मग ते त्याकडून किती घोर कर्मे करवील याचा नियमच नाहीं. मग त्याला आप्त नाहीं, इष्ट नाहीं; सुहृत् नाहीं, संबंधीं नाहीं; स्त्रदेशी नाहीं, विदेशी नाही; स्वज्ञाति नाहीं, परज्ञाति नाहीं एकदां तें निंद्यक करणारे पिशाच्च हात धुऊन मार्गे लागले की, चटसारे शहाण- पण गुंडाळून ठेवून आपल्यासारख्या कृति करावयास लावणारच. साधूपुरुषांनी आशेला राक्षसीची उपमा दिली आहे ती किती सार्थ आहे? राक्षसीची जसी याचा खाऊं? त्याला खाऊं? याच्या नरडीचा घोंट घेऊं? याला अचानक उचलून मट् करूं ! अशी खाखा • वलेली वृत्ति असते, तशीच दशा आशेची. परमेश्वरी मायेच्या कर्माचा जसा अंतपार नाहीं, तसाच आशे- च्या कर्माचाही नाही. ह्मणून आशेची ज्याने निराशा केली- तिची सर्वथैव खोड जिरविली-तोच धन्य! असो. सांगण्याचा मतलच ह्मणून इतकाच की, दक्षिण अफ्रि- केत जो दारुण युद्धप्रसंग माजला आहे, त्याला प्राधान्य कारण तेथील हिन्यांच्या खाणी होत. तेथील खाणींत हिरे इतके विपूल सांपडतात की, कित्येक लोकांनी तेथें अल्पावकाशांत जितकी संपत्ति मिळविली आहे; तितकी दुसऱ्या कोणत्याही स्थी कोणीच मिळविली नाही, असें ह्मटलें तर अत्युक्ति होणार नाहीं. बरें,
पान:लोकमित्र १९००.pdf/१९
Appearance