Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८९ ) राहतात. खासीस लोक वरील लोकां पेक्षां स्वभावानें आनंदी असून, उद्योगी व नीतिमान आहेत. यांच्या राज्यांत नेहमीं शांतता असते, पण जर कां यांच्या हक्काची पायमल्ली जाहली तर ते जिवावर उठतात. हे लोक जरी अज्ञानी आहेत तरी त्यांस शिकण्याची फार हौस असल्यामुळे अलिकडे त्यांनी शाळा स्थापन केल्या आहेत. लहान लहान ओढ्यांवरून झाडांच्या फांद्या व मुळे एकमेकांत मिसळून बळकट पूल बांधण्यांत त्यांचें चातुर्य दिसून येतें. गोन्या लोकांचा व यांचा धर्म एकच आहे. यांची लग्नें आई बापाच्या पसंतीनें न होतां वधुवरांची मनें जुळलीं ह्मणजे झाले. एकमेकांच्या विचारानें एक दिवस ठरवून लग्ने करण्याचा प्रचार आहे. मरणोत्तर मृतमनुष्यास एका पेटीत घालून वाजत- गाजत नेऊन पुरतात. हीं वाद्ये वेळूची केलेली असतात. काचारी लोक धट्टे कट्टे व उद्योगी असतात, परंतु ते एके ठिकाणीं कधींही राहत नाहीत, ते काचार प्रातां- शिवाय इतर ठिकाणी लहान लहान वसाहती करून आहेत. डोंगरांत राहणारे लोक डोंगरी भाषा बोलतात व पायथ्याशी राहणारे लोक स्वभाषा बोलून आसामी भषा जाणतात. असें ह्मणतात की, आठांपेक्षा जास्त संख्या मोजण्यास त्यांच्या भाषेत शब्द नाहीत, याव- रून यांचें अज्ञान सहजच दिसून येतें ! हे लोक तीन वर्षापेक्षा जास्त खेपा एकच शेत नांगरीत नाहीत, हे भात पिकवून आपला उदरनिर्वाह करतात. भूतानमध्यें या लोकांस मेक्स असे नांव आहे. यांच्या चाली रीती फार घाणेरड्या असून खाण्यांत निर्णय नसतो, यांचे