Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८८ ) (clan ) नांव देखील सोडितो. त्यांच्यांत आणखी एक चाल फार मजेदार आहे. एखाद्या मनुष्यानें दुसऱ्याची लाडकी मुलगी लग्नकरून घेतली तर त्यास आपल्या सासऱ्याच्या मरणोत्तर सासवेशी लग्न लावणे माग आहे, असे झाल्यावरच त्यास आपल्या सास- ज्याच्या जिंदगीवर हक येतो !!! बायको ही कुटुं- बांतील मुख्य मनुष्य आहे. हे मूर्तीपूजक नाहींत, परंतु त्यांच्यामतें कोणी " सजंग " नांवाचा देव आहे त्यावर ते विश्वास ठेवितात. परंतु त्यास पूजत नाहीत, हें नांव सूर्यासच आहे. आपल्या विपत्तीचें कारण ते एक पिशाच आहे त्याच्याशीं लावितात. कांही विविक्षीत लोकांच्या अंगीं परकायाप्रवेशाची ताकत आहे व ते वाघ, सिंह, इत्यादि जनावरांच्या शरीरांत प्रवेश करितात अशी समजूत सार्वत्रिक आहे. मरणोत्तर मृतमनुप्यावर उत्तम उत्तम कपडे त्यास तीन दिवस पर्यंत तसेच ठेवितात व नंतर त्यास घरापासून थोड्या अंतरावर एक चिता रचलेली असते तेथे नेऊन जाळितात. घालून सोसंग नांवाच्या टेकडीच्या उत्तरेस एक टेकडी आहे तीच मृतमनुष्याच्या आत्म्याचें विश्रांतिस्थान अशी त्यांची समजूत असल्यामुळे आत्म्यास वाटखर्चीला पुरे इतकें अन्न व पाणी त्या चितेवर ठेविलेले असते. गारो व मणिपूर यांच्या दरम्यान जी पर्वताची रांग आहे त्यांतील एका टेकडीवर खासीस नांवाचे लोक राहतात व शिलंग नांवाच्या टेकडीवर त्या प्रांताचे सरकारी कामदार व आरोग्यरक्षण खात्यापैकी लोक