या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( १८४ ) वसंत ऋतु. - ( वीरा भ्रमरा या चा० ) घसंतमासी सायंकाळी सहज मुदित अंतरी । पातलों रम्य वना भीतरीं ॥ धृ० ॥ सुवास दूर्ते मोहुनियां मज, नेले त्या भूवरी । जेथे मुग्धलता सुंदरी ॥ १ ॥ रम्य तयांची देखनि लीला, मन माझे गुंगलें । भासे स्वप्नचि हे देखिलें ॥ २ ॥ रक्तपीतशा विचित्रवर्णी, नाना सुम-भूषण। तरुवरां कवळिति तत् कामिनी ॥ ३ ॥ मिश्र-सु-वर्णी कोमल पक्षी शाखाकरिं बैसती । कोकिला कूजित आरंभिती ॥ ४ ॥ अनेक रंगी बहु आकृतिचे जलद नभी दीसती । जलशय स्वादु धवल भासती ॥ ५ ॥ मंद सुगंधित मदन-दासि ह्या वायुलहरि वाहती । मानसा प्रेमशरें ताडिती ॥ ६ ॥ नंदनवन हें स्वर्लोकांचें भूलोकों जणुं दिसे | ऐसे मजला भरलें पिसें ॥ ७ ॥ एकाएकी तान्हें बालक डचके बहु अंतरीं ॥ तशीच मस्थिति झाली बावरी ॥ ८ ॥ भीतमनाला धीर देउनी कवळुनि मनि माथवा ॥ सुशीला आलिंगी प्रिय-धवा ।। ९ ।