( १८० ) स्थानांत व कर्नाटकांत फिरत. ह्याने मोठाले मुलुख सर करून चौथाई घेतली. यास लढाईचे प्रसंग हैदर- नाइकाशी फार पडले. दादासाहेब काशेगांवचे लढा- ईस गेले तेव्हां गंगावाईल जनार्दन रामचंद्र आठवले पागेदार यांनी शनवारचे वाड्यांतून काढून पुरंदरावर पोचविली. आणि पुण्यांत मसलत झाली कीं, दादा- साहेबांस पुन्हा पुण्यांत घ्यावयाचें नाहीं. तेव्हां त्यांचे प्रतिबंधाकरतां प्रथम त्रिंबकराव मामास रवाना केलें. त्यांनीं घाईनें जाऊन थकलेली फौज असतांच दादा- साहेबाशी युद्ध आरंभिलें. त्यांत त्यांचा मोड होऊन मामा घरलेगले तेव्हां त्यांस आनंदीबाईनें आणून बांधून मारण्यास आरंभ केला. आणि मामास ह्मणाली कीं, तुह्मी चार लुच्चयांनी मिळून आमचे विरुद्ध बंड उभें केले आहे तें आह्मांस ठाउके आहे. तो पक्ष सोडून द्या असें ह्मणून जेरबंदाचे फटके मारवी व अंगावर मीठाचे पाणी सिंपडी, तेव्हां मामा उत्तर देत कीं, रांडे ! तुझे नवरे पुण्यांत बहुत आहेत, मी एक मेलों तर चिंता नाही पण आह्मीं बेत केला आहे त्याप्रमाणें तुमचे पाय पुण्यास पुनरपी लागावयाचे नाहींत; त्याची काळजी नको. अर्से लगता ह्मणता मामांचा प्राण गेला. पुढें नानाफडणविसांनी हरपिंत फडके यांस रवाना केले. फत्तेसिंग माने यानीं शिंद्यांचे बायांचें बंड झालें त्या- वेळेस बंड उभें केलें होतें. तो एका शिल्लेदाराच्या घरीं गेला आणि ह्मणाला कीं, तुमचा घोडा आहे तो आह्मांस द्यावा. तेव्हां शिल्छेदार - फार चांगला कणेरखेडचा
पान:लोकमित्र १९००.pdf/१८०
Appearance