( १८ ) परम विचित्र असते. जे संपत्तीचें माहेर घर; केराकच- ज्यांत जेथे सुवर्ण व जवाहीर पडलेले किंवा अहोरात्र जेथें हिरे माणकांचा प्रकाश परिप्रसृत व्हावयाचा, तेथें आज हजारों वीरमणींचा संहार होऊन रक्ताचे वहावे; जेथे स्वराज्य असल्याकारणाने नेहमीं शांतता असावयाची, तेथे दारुग युद्धप्रसंग प्राप्त होऊन भूमि- मातेच्या परम वंदनीय अंकावर हजारों वीर पाट अक्षय गाढ निद्रावश व्हावी ? ज्या भूदेवीच्या कंउप्रदेशी लक्षावधि अमोलिकमणि माणिक्याचा सुरम्य हार रुळत रहावयाचा, तेथें वीरमणीचे रुंडमार्ने निःस्तब्ध पडून रहावें ! परमेश्वरी लीलेचा किती अगम्य प्रकार आहे? केवळ संपत्तिप्रीत्यर्थ साभिमान होत्साते आज हजारों वीरवर हातांत शिरकम घेऊन ती भूमिदेवीच्या शिरकमली अर्पण करण्यास सुसिद्ध होत आहेत ? मारूं किंवा मरूं अशा मनोनिग्रहानें पक्ष प्रतिरक्ष युद्धव्यापार कशानिकरानें चालवित आहे? प्राणासारखी प्रीय भी मुले लेकरें, परमपूज्य जी मातापितरे आणि परम सौख्यदायक-प्रसंग विशेषीं जिवास नीव देणारे जे बंधुवांधव त्यांचा व परम दुर्मिळ जी नरतनु तिचीही बेपर्वा करून आज कित्येक वीरपुरुष परमोत्साहानें कुणिकडच्या कुणीकडे जात आहेत? बरें त्यांच्या कारणांचा सूक्ष्मतेर्ने विचार केला तर, केवळ संपत्तीची लालसा ! दुसरे कांहीं नाहीं. ज्या नरदेहास पाण्याव. रील बुडबुडा ह्मणावयाचें; “ क्षणं चित्तं क्षणं वित्तं " " आह्मांला काय कमी आहे! " " आह्मी केवळ परोपकारार्थ राज्यशकट चालवित आहों " अशा अगर
पान:लोकमित्र १९००.pdf/१८
Appearance