( १७९ ) लढाईची वेळ आली ह्मणजे सर्वांच्या तोंडचें पाणी पळत असे. जसें लग्नास आनंदाने जावें तसे लढाईत जाणारे शूर पुरुष ब्राह्मणांत दोन, परशुरामभाऊ व बापूगोखले. शेवटल्या बाजीरावाचे कारकीर्दीत हीं दोन नांवें आहेत. ५ इंग्रजानें बोलणे लावलें की, आमचा वकील पुण्यास असावा. तेव्हां दरबार भरलें, तमाम मुत्सद्दी व सर- दार यांस पाचारण केले, त्यावेळी सखारामबापू बोकील यानें सांगिलें कीं, पेशव्यांचा वकील लंडनास ठेवावा आणि इंग्रजांचा वकील पुण्यास आणावा. एक- पक्षी वकील घेतल्यास आपले घरचा भेद बाहेर जाईल आणि दुसऱ्याच्या घरचा भेद मात्र आपणास मिळणार नाहीं व येणेकरून फजिती होईल. आणि इंग्रज कल- त्यास वगैरे वाढतच चालले त्याप्रमाणे येथेंही प्रवेश होऊन पसरतील; परंतु हा बेत नानाफडणविसास ठीक वाटला नाही आणि त्यानें संमती दिली त्यावरून मिस्तर मालीट पुण्यात येऊन राहिले. पुढे पर्वतीची हवा वाईट वाटली ह्मणून त्रिंबकरावमामा पेठे यांचा इनामगांव भांभुर्डे येथें नदीकाठी त्यास जागा दिली व पुढे सर्वच ठीक झालें. ६ त्रिंबकरावमामा पेठे यांची बहीण सदाशिवराव भाऊ पेशवे यांस दिली होती. तिचें नांव पार्वतीबाई. हे मामा नाशिकचे राहणार. यांची शिपाईगिरी व एकनिष्टा मोठी होती. हे मोठ्या फौजा घेऊन हिंदु-
पान:लोकमित्र १९००.pdf/१७९
Appearance