( १७८) नवण्याची क्रिया तुर्त करावयाची नाहीं, जेव्हां धोंडी याघास मारूनयाल तेव्हां क्रिया करूं असे तिने सांगून उभयतांस परत काढले. ते निघाले ते१८०२ सालीं वेल्सली साहेब मुंबई गव्हनरचे हुकमा वरून बाजी रावास राज्यावर बसविण्यास श्रीरंग पट्टणची फौज घेऊन येत होते, त्यांनी जाहिरनामा लावला होता कीं, " श्रीमंत पेशव्यांचा व इंग्रज सरकारचा दोस्तीतह- नामा होऊन त्यास होळकराने काढून दिले आहे, त्यास परत आणण्याकरितां जात आहों. बरोबर निजाम सरकारची फौज आहे, तरी कोणी पुंड- पाळेगार व पेशव्यांचे सरदार जे असतील त्यांनी इंग्रज सरकारच्या लष्करांत येऊन मिळावें. " ह्या धोरणानें बापू गोखले वेल्सलीसाहेबांस जाऊन भेटले आणि सांगितले की, आमचा हेतू घोंडीवावास मारण्याचा आहे. तेव्हां साहेब बोलले कीं, आह्मी श्रीरंग- पण घेतल्यापासून आह्मासही त्यानें फार उपद्रव दिला आहे, याकरतां आमची फौज त्याचे पाठीवर आहेच. दोन चार दिवसांत त्यास घेरून घेऊं तुह्मी त्याचे तलासावर असा. नंतर तिसरे दिवशी त्याची व फौजेची गांठ पडली व त्या लढाईत वाघ ठार झाला. तेव्हां त्याचें शीर भाल्यास लावून लप्करांत चौघडा वाजवून साखरा वाटल्या आणि ते वर्तमान लक्ष्मीबाईकडे आल्यावर मग तिनें क्रिया करूं दिली. असी ती बाई, निष्टूर व धैर्यवान होती. ४ पेशव्यांजवळ शिपाई ह्मणविणारे बहुत होते; परंतु,
पान:लोकमित्र १९००.pdf/१७८
Appearance