( १७३ ) अनेक नामांकीत राजांकडून त्याला आपल्या मुलीकरीतां मागण्या येऊं लागल्या. बुद्धास या वेळेस मोठं कोर्डेच येऊन पडलें. शेवटीं पूर्ण विचारकरून असे ठरविलें कीं, लग्न करण्यास कांही हरकत नाहीं. त्याचे बापास हा निश्चय ऐकून अर्थातच अत्यानंद झाला; व त्यानं लागलींच एक राजकन्या पसंत करून आपल्या मुलाचे एकदाचें दोनचे चार हात केले. जन्मादारभ्य ज्यांनी या भवसागरांतील लाटांचा व भयंकर तुफानांचा पूर्ण अभ्यास केला आहे ते काय आपले तारुं वाटेल तेव्हां आंत ढकलण्यास भिणार आहेत थोडेच ? बुद्धजरी अशा रीतीनें संसारांत पडले तरी त्यांचा निर्वाणीचा राजमार्ग शोधून काढण्यचा प्रयत्न जोरानें चालू होताच. पुढे त्यांचे मनास उपरती होण्यास खालील गोष्ट विशेष कारणीभूत झाली. ते एकेदिवशी रथांत बसून आपले रमणोद्यानाकडे मृगयेस चालले होते. तेव्हां त्यांना रस्त्यांत एक अगदी जख्ख ह्मातारा दिसला. त्याचे सर्वांगावर सुरकुत्या आल्या होत्या. डोक्याला टक्कल पडून अवशिष्ट राहिलेले तुरळक तुरळक केश रुपेरी " झाले होते. दातांनीं सोडल्याकारणानें तोंडाचे बोळकें होऊन थोबाडांतून लाळाप्रवाह चालला होता. शरीर नखशिखांत लट् लट् कांपत होतें. एकंदरीत तो वार्धक्याची केवळ मूर्तीच दिसत होता. 66 बुद्ध लहानपणापासून राजवाड्यांत वाढला असल्या- कारणानें त्यास तेथें अशी व्यक्ती कुठून पहावयास मिळ- णार? त्यानें सारथ्यास हा माणूस कोण आहे व याची
पान:लोकमित्र १९००.pdf/१७३
Appearance