Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७० ) तरी पूर्ण मुख असेल. पण विचाराअंती हा सर्व भ्रम ठरतो. किड्या पाखरांना कां थोडींच आह्मासारखीं आपल्या मुलाबाळांची लग्ने करावयाची आहेत आणि संसार मांडावयाचे आहेत, तर त्यानां सुख नसणार आहे? बरोबर आहे. एकदां त्या होल्याच्या जोडप्याची आठवण करा. कुत्रा पाहतांच मोठ्या सुखानें तें उडून गेले असेल नाही? या पृथ्वीवरील कोणताही प्राणी घेतला तरी त्यांचे पाठीमागें कोणतीना कोणती तरी उपाधी लागलेली आहेच. उंदराला मांजराची भीती, मांजराला कुत्र्याची भीती, कुत्र्याला लांडग्याची, लांड- ग्याला पारध्याची ही परंपरा चालूंच आहे. सारांश मुख पाहतां जवा पाड़े " 44 संसारांत अमुक मनुष्य सुखी आहे असे आपण हमेप ह्मणतों. आपली ही मुखाची कल्पना तारतम्य दर्शक आहे. अमुक सुखी आहे याचा अर्थ एवढाच कीं, त्यास फलण्यापेक्षां दुःख कमी असून सुखलेश जास्त आहे, दुःखापेक्षां मुखाचा वांटा अधीक झाला की, तो मनुष्य या संसारांत सुखी ह्मणून गणला जातो. हा सुखाचा वांटा कमी अधीक मिळण्यास अमुक स्थितीची जरूर आहे किंवा अमुक द्रव्यसंचय झाला पाहिजे असे नाहीं. तें ज्याच्या त्याच्या स्वभावावर व मनो- वृत्तिवर अवलंबून आहे. अगदी थोडें द्रव्य असूनही पूर्ण सुख भोगीत असलेले कांहीं हरीचेलाल आपले पाह- ण्यांत येतात, व कांहीं कुबेरासारखी अलोट संपत्ति पदरीं असूनही नेहमीं दुःखार्णवांत गढलेले दिसतात. एखाद्या दरिद्र्यास थोडीशी जरी मदत केली तरी तो आनंद