या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( १६७ ) कधीं कधीं लिहिणाराचीं नावे त्यांचे कुटुंब मोठें अस ल्यास दोनशें जवळ सुद्धां भरतात !! करमणूक. - गिन्हा० - कां शेटजी, गूळ कसा काय आहे आज ! दुकान० - कां महाराज; त्यांत कांहीं फरक नाहीं. नेहमीं सारखाच गोड आहे. -
खानेसुमारीतील गणतीदार-मग तुमचें वय काय ! पृहस्थ० - आमच्या शेजारच्या गणोबानें वय सांगितले कां! - गणतीदार० - होय. गृहस्थ- मग त्यांच्याहून मी दोन वर्षानीं लहान - आहे. चिऊताई व एक ह्मातारेबाबा कर्मधर्म संयोगानें एकाच आगगाडीचे डब्यांत शेजारी शेजारी बसले होते! ह्मातारेबाबा ह्मणतात- "बाईसाहेब, मुलंबाळं काय आहेत आपल्याला ! " चिऊताई- एकच मुलगा आहे बाबा. ह्या-कांहीं विडीबिडीचा नाद लागला आहे किं नाहीं त्याला ? चि-छेहो ! विडीला हात नाहीं लावलान् भनून, तर ओढायचं दूरच राहिलं. - -