महिषी घुबड सूर्य भेघ ( १३५ ) दधि पय घृत मुत्रा मानिती पूज्य लोकों ।
अशुभ वदन परी गे लेखिती है विलोकी ॥ ८ ॥ अमित विनय अंगी बा तुझ्या वारि-राशी । क्षय न तव जल.ला ना कधी वृद्धि तैसी ॥ जलचर बहु पोर्टी तेंवि बा राहताती । लवण जल ह्मणोनी लोक हे देष देती ॥ ९॥ पय तव महिषी गे पुष्टि देते जनांतें । रुचकर बहु लागे वर्णु भी काय त्यातें ।। झिजवुनि निज देहा पोशिसी तूं जरी गे । बघुनि तव कुरूपां नीच हे हांसती गे ।। १० ॥ भयद-रव करोनी भीववीसी भुजंगा | रिघुनि सदनि त्यांच्या बोंचिसी चंचु अंगा || निजमनिं परि घूका मानि ना दर्प याचा मारचि उदय होता अंध होशील साचा ॥ ११ ॥ | खचित सकल सृष्टी पोशिसी अ.रम-तेजें। मनुज खग पशूंचा तारिता नाम साजे ॥ ना घन परि सूर्या मार्ग हे रोधुनीया | त्वदिय हरिति दीप्ती, गर्व हा सत्य वायां ॥ १२ ॥ तुजसम नच मेघा देखिला अन्य दाता । पुरविसि मनुजेच्छा वर्षेनी नित्य ताता ॥ परि नच जलबिंदू लाभतो चातकातें । अनुदिनि रडुनी तो दूषितो फार तूंतें ॥ १३ ॥ ( पुढे चालू. ) आपटे.