( १६ ) तैल युक्त ते ठेविली कडा, लाविला स्वधानाथ चौकडा । बाण पंचकें ठेविली तळ, ऊर्ध्व बांधिली मच्छ पूतळी ॥ ४ ॥ साप सारिखे चाप मांडिती, भूप देखतां हूप सांडिती । बोलती महा घोर हा दिसे, पाहूं ना कर्धी आझि या दिशे ॥ ५ ॥ स्वयंत्रराच्या वेळी तापस जनांत पांडव व श्रीकृष्ण बसले होते त्यांचे वर्णन कवीनें केले आहे. श्लोक. सौंदर्ये रतिनाथ भार्गव दुजे शस्त्रास्त्र विद्याबळे । जीवा तुल्य चतूर पाळक जगीं चंद्राहुनी आगळे । गांभीयें वरुणा लयासि जिणती औदार्य मेघापरी । कीर्तीभास्कर तस्करासम प्रभा लोपून आले पुरीं ॥ १ ॥ आला कौस्तुभधारी गिरिधर अधरीं वेणुधारी मुरारी । कंसारी पूतनारी क्षितिधर वर जो कृष्ण काकोदरारी । शंखारी शंखधारी जलजदर गदा चक्रवारी भवारी । विश्वाचा सूत्रधारी घरित शिरि जया पायचें सांव वारी २ द्रुपदाने लाग्लेचा पण जिंकून द्रौपदीचे पाणीग्रहण करण्याच्या इच्छेनें कर्णाने कोदंडास हात घातला पण तो प्रचंड चाप उचलेना. तेव्हांची कर्णाचि स्थिति क वीनें वर्णित्री आहे. लोक. तो कोदंड प्रचंड कर्ण उचलूं जातां न हाले कदां । घाली हात तदां समस्त दशनां चावूनियां एकदशं । केली हारवटी बहूपरि नुठी कार्मुक बाहूवी । लोटी चावुनियां मुझे मणगी ते व्यर्थची चावटी ॥ १ ॥ झाला वीर हीं पडोनि उचली कष्टेंचि जानूवरी । नोहे ऊर्ध्वपुढें तथा तिळभरी ' आणा ' ह्मणे नोवरी । राजा हास्य मुखें वदे, 'पण भला आदीं तुर्की जिंकिला । जाणो हेतचि राहिला तव जियीं पाहूनि जावें तिला ॥२॥
पान:लोकमित्र १९००.pdf/१६
Appearance