( १५९ ) भाग ४ था. । कांहीं पढतां जड भारी। मनीं आठवावा हरी ॥ १ ॥ हणजे तोच कृपानिधी वारिल सांकडे । येर ते बापुडें काय रंक ॥ २ ॥ तुकाराम. " सुखांत बायको व दुःखांत आई आणि ईश्वर यांची आठवण प्रत्येक व्यक्तीमात्रास होत असते असा सर्व- साधारण नियम आहे. ह्या नियमांस अनुसरून तुरुंगां- तील एक निरपराधि कैदी आपले हातकड्यांकडे लक्ष गेल्यानें मनाशींच हळहळत बसला होता. सकाळचे दहा वाजण्याचा सुमार झाला होता तरी देखील त्याचा प्रातर्विधी अद्याप उरकला नव्हताच. तो स्वतःचा निरप- राधिपणा मनांत आणून “ सोम्याचे प्रायश्चित्त गोम्याला " मिळाल्या बद्दल फारच कष्टी होत होता. त्या दुःखाचे भरांत त्याने सर्वसत्ताधीशाचे अन्यायां बद्दल त्याला शिव्या द्याव्यात फिरून रागाची पदच्युति होऊन विचा- राचे साम्राज्य सुरू झाल्या बरोबर त्याच अचिंत्याची मनोभावानें प्रार्थना करून आपली मुक्तता करण्याबद्दल त्याला परोपरीने आळवावे असा त्याचा क्रम सुरू होता. तरी देखील त्याला आपले गणपतराव व शंकरराव ह्या मिश्रद्वयांचे आधाराने त्या स्थितींतून सुटका होण्याचा पक्का भरंवसा वाटत होता. तो दिवस त्याचा अखेर निकाळाचा असन त्याची स्थिती “ चोरास सोडून सन्या- शास सुळावर चढविण्या" प्रमाणेंच होती. अशा विप न्नावस्थेतही मित्रांचा पूर्ण आधार असल्याने तो दुःखोत
पान:लोकमित्र १९००.pdf/१५९
Appearance