Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५१ ) धूर्त, जहांबाज, मानी, निष्टर, अविश्वासी, लोभी, पाप पु प्याबद्दल बेपर्वा, साहसी व चंचल वृत्तींच्या केवळ खाणीच होत ! मत्सर हा ज्यांचे पांचवी सहावीस पाटयावरच पुज- लेला, पुरुषांचे तारुण्याची बहार शोषण करणाऱ्या केवळ जळवाच ! प्रसंगापुरता लुब्रेपणा करून स्वहेतू साध्य झाल्यावर सर्पा प्रमाणें उलटणाऱ्या, कामाचे अनावर- पणानें परद्वार करण्यास कधींही न कचरणाया, आपला लौकिक घालवून दोन्ही कुलांचाही घालविणाऱ्या, अशा अनेक दुर्गुणांच्या केवळ जनित्याच, आह्मी परद्वारी झाल्या स एकच कूळ नरकांत टाकतों पण त्याच तुझीं वां कडे पाऊल टाकल्यस सासरच्या व माहेरच्या बेच्याळीसां- चा उद्धार होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही ! ह्यास प्रत्यक्ष प्रमाण तूंच! अशांना सजीव निशाचरीच झटस्या पाहिजेत !! धिक्कार ! धिक्कार !! धिक्कार !!! इतके भाषण संपल्यावर त्या पुरुषाने तिचे आंगावरील सर्व चीजवस्त बळजबरीने काढून घेऊन तो तेथून फरारी झाला, त्याचे पाळधींवर असलेला तो भिकारीही त्याचे मागोमाग गेला, व ती हतदैवी स्त्री " हैव गेलें दैव गेलं आणि हातीं धुपाटण आर्ले" असे ह्मणत, व कृतकर्मा- चा पश्चाताप करीत त्याच घरांत तळमळत पडली. "करावें तसे भरावें. भाग ३ रा. वीणा नाद कुठे भयंकर अशा शोक कुला आयको I कोठें मंगल लम उत्सव तदां शोकाकुली बायको ॥