Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्वाचेचि हुड़े विलोकुनि दडे तो काळ एकीकडे । सत्वावण बुडे यमावर पडे होतीच ते बापुढे ॥ २ ॥ सर्वार्थी निघड़े सर्वे संवगडे ते सत्व मेरू गडे । सत्वांचें अंगडें करोनि झगडे काळा प्रसंगी भिडे || सत्वार्थी न पडे वृथा चरफडे वैसे भवाब्धी थडे । सत्वें श्वापदंडें वन्या धडकुडे गेलेचि मुक्तीकडे ॥ ३ ॥ अर्जुनाने द्रुपद राजास जिंकून त्याचे अर्धे राज्य द्रोर्णाचार्यास दिले होते. त्या रागाने द्रोर्णाचार्यान द्रुपदास त्रास देण्याचे आरंभळे तेव्हां, तो त्रास सहन न होऊन द्रुपदराजा भागिरथी तटाकी जाऊन उप- याज ऋषीस नमून वर मागूं लागला त्याचे वर्णन खा: लील श्लोकांत केले आहे. श्लोक. द्रोणातें वधिसा सुपुत्र परिसा देऊनि संसारसा | माझा तूं सरसा करी भरंवसा वाहे मनी फारसा ॥ कन्या सुंदर रूपसा मज दिसे जामात पार्था असा । •व्हावा आवडि स्वामिने पुरवितां आनंद हृत्सारसा ॥ १ ॥ द्रुपदानें स्वयंवराच्या वेळी कशा प्रकारचा मंडप उभारला होता व आंत कोणकोणत्या वस्तु मांडल्या होत्या है खालील कवितेत निर्दिष्ट केले आहे. लोक ( कामदावृत्त. ) मरुड पाचुचे स्तंभ शोभले, विचित्र चित्रकी चित्रले भले । जडित माणिक दिव्य पोवळी, सुरस रेखिलीं चोख पोवळी | १| चांदवा जसा चंद्र तो नभीं, अक्षयींच हा राहु तो न भी | पातले भुमीपाळ मांडवा, वर्णिती महाश्वर्य तांडवा ।। २ ।। दाटले सुधा पानि ही नभा, वाटला तयां स्वर्ग हीन बा । मध्य मंडपी यंत्रसी क्षिती, स्थापितां धराधीप लक्षिती ॥ ३ ॥