Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४८ ) स्त्री० -काल दिवसा ठरल्याप्रमाणे मी रात्री किल्यांत जाऊन ऐन दोन वाजण्याचे सुमारास तुरुंगाचे चोर- दारावा तुमचे स्नेह्यास किती शिताफीने पार पाडून दिलें, व तुमची चिठ्ठी त्याचे हवाली करून देऊन त्याला संकेतस्थळी कसे दाखल केलें ! पुरुष ह्मगतातना की बायका तेथून अवला. त्यांच्या हातून मर्दुमकीच्या कितीशा गोष्टी तडीस जाणार ! जगांतील सर्व शूरत्वाची कृत्ये॑ अस्मादिकांची! पण ह्या समजुतीची अन्वर्थकता काल आपले प्रत्ययास आली किंवा नाहीं! जेथे आपल्या- सारख्या कारस्थान्याचें वोट शिरकण्याची मारामार त्याच कडेकोट बंदोबस्तांतून एक राजद्रोहाचा कैदी फरारी करविण्यास कारण कोण तर हीच अवला! व तीही फक्त आपला व माझा परिचय होऊन ह्या देहाचें घनित्व आपलेकडे आल्यामुळेच. कारण की आपण आपल्या सदयतेस अनुसरून माझे सौभाग्यास निरंतरची लागलेली ओहोटी आपल्या शरीररूप चंद्रानें आकर्षण केल्यामुळे त्या सौभाग्यसिंधूस आपरंपार भरती आली आहे. आतां दासीची ह्मणून विनंति हीच कीं, आपला व माझा अल्पही वियोग न घडावा. नाहींतर " गरज सरो नि वैद्य मरो " अशांतली गत व्हावयाची. तसे घडून आल्यास मग मात्र माझे हाल कुत्रा देखील खाणार नाहीं. 66 पुरुष० - तूं ह्मणतेस ती गोष्ट शक्य आहे. पण तिला बहादुरीपेक्षां चतुरता ह्मणणे जास्त शोभेल. हा गुण तुह्मां बायकांचे आंगी नैसरगकच असतो. आह्मां पुरुषांना मात्र सतत श्रमानें, ग्रंथावलोकनांनें व तुमच्या