काळ्या चंद्रकळेचे चोळीवरील खडीप्रमाणे चकाकत होतीं. गांवांतील कोंबड्यांनी आपली पहिली साद घालून उद्योगी लोकांस जागे करून सोडल्यास चराच वेळ गेला होता. अशावेळीं एक मनुष्य एकागांवच्या नजी- कच्या किल्यावरून अरण्यांत जात होता. त्याचे एकंदर हालचालीवरून तो भयचकित झालेला असावासें दिसत होतें. कारण त्याचे पाऊल जरी झपाट्याने पुढे पडत होतें तरी तें चोरूनच. तो जरी सारखा पुढे चालला होता तरी वारंवार मागे वळून पाहात होता. त्याचा चालण्याचा रस्ताही आडी-आडचणींतूनच होता. त्यानें चार पावले टाकावीं, अमळ थांबावें, आसपास आपली नजर फेंकावी व फिरून तडाख्याने पुढे चालू लागावें. असे करता करतां तो एका विविक्षितस्थळी येऊन पोहोंचला. जवळपास कानोसा घेऊन पाहातो तो त्याचे कानीं घोड्याचे टापांचा आवाज पडला. त्या बरोबर त्याचे चेहेन्यावर भय व आनंद अशा विषमवृत्तींचें प्रतिबिंव दिसूं लागले, छाती धडधडूं लागली, अंगास दरदरून घाम आला, हातापायांस लटलटां कंपसुटला व आपली पुढे काय गती होणार ह्याचा त्याला कांहींच अंदाज लागेना. इतक्यांत घोडा येऊन थडकला, त्याचेव रील स्वाराने त्यास रामराम करून, त्या घोक्यावर बसण्याची त्याला मुकाट्यानें खूण केली, एक कागद त्या पुढे टाकला व तो चटदिशीं तेथून पार निघून गेला. नंतर तो गृहस्थ स्थीर होऊन, घोड्यावर बसून, तेथून चालता झाला. " खाई त्याला खवखवे " 66
पान:लोकमित्र १९००.pdf/१४६
Appearance