Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४४ ) - रस काढून देवाला अर्पण करून आपणही यथाविधी प्राशन करणे हे कृत्य मोठें पवित्र मानले जात होतं. यज्ञ विद्येचा प्रारंभ अग्निहोत्रापासून होतो. गृहस्थाश्रमी असलेले ब्राह्मण व क्षत्रियही अग्निहोत्र न घेतील तर त्यांचा लोकांत मानमान्यता मिळत नव्हती. व अग्नि- होत्री झाला ह्मणजे त्याला दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशु, सोम इत्यादी यज्ञ करावेच लागत. ते केले ह्मण ने अर्थात् सोमानें प्राशन घडत असे व त्याला 'सोमपथि ' अर्थात सोम प्राशन केलेला-असे ह्मणत असत वसोम प्राशन केल्यावांचून समाजांत त्याची प्रतिष्टा वाढत नसे. २ - पूर्वकाळी लढाईत शस्त्रे आणि अस्त्र या दोहोंचा उपयोग करीत असत. बंदुका, तलवार, माला, इत्यादि हीं शत्रु. व पाशुपत, ऐंद्र, वारुण, अग्नेय, इत्यादि हीं अस्त्रे होत. शस्त्रे हीं तिखें, किंवा दुसऱ्या कोणत्याही धातूची बनविलेली असून त्यांचा उपयोग नियमित रीतीनें व्हावयाचा, पण अस्त्राचा प्रकार तसा नहीं. त्यांचा आकार वगैरे काही नाही. त्याचे निरनिराळे मंत्र असून गुरुपासून त्या त्या मंत्राचा यथाविधी उपदेश घेऊन पुरश्चरण वगैरे जे काही नियम सांगितले असतील त्याप्रमार्गे करावें लगतें. ज्यावेळी काही प्रसंग पडेल त्यावेळी त्यांचा उपयोग के, ह्मणजे त्या त्या देवते कडून ते ते कार्य होई. जर्मे-आग्नेयास्त्राचा प्रयोग केला तर शत्रुवर असीची वृष्टी व्हावी, पर्जन्यास्त्राचा प्रयोग केला तर पाऊस पडावा, याप्रमाणे, पूर्वकाळी त्यांचा उपयोग होत असे.