Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११५ ) Pro आवश्यक असतात, त्या तो हरतऱ्हेने स्वहस्तगत करितो. ही गोष्ट नेहमी दृष्टीस पडते. त्याप्रमाणें एव- ढ्यानेंच तृप्त न होतां, तो, विस्तव, पाणी, वा, वीज, सूर्य इत्यादिकांकडून आपली इष्टका करून घेतो, हैं- ही पदोपदी दिसून येतें. हा एवढा प्रभाव कशाचा वरें तर त्याच्या बुद्धीना. 66 एक विद्वान आणि शोधक पुरुष ह्मणतो, "मनु- प्याच्या अंगावर लोकर, केस अथवा पंख जर असते, तर त्यानें कोष्टी होऊन वस्त्रे कर्धीही विणिली नसती. स्वसंरक्षणास त्याला जर दांत किंवा नखे चांगली बळ- कट असती तर तरवारी बंदुका इत्यादि हत्यारे त्यानें वेली नसती, त्याला लगामाची गरज कधी लागडी नसती, तो घोड्यावर कधी बसला नसता, त्याने लिही. ण्या वाचण्याची युक्ति शोधून काढिली नसती, नाटक इतिहासादि ग्रंथांच्या अवलोकनाने आपल्या चित्तास T E रंजविण्याचे प्रयोजन त्यास पडले नसते, मोठमोठ्या " विद्वान गृहस्थाचे गहन ग्रंथ पाहून त्यांविषयी त्यानें कधी विच्यारही केला नसता " होय ही गोष्ट खरी आहे. मनुष्याचा काय, आणि इतर प्राण्याचा काय, मूळ स्वभाव असा आहे की, कोणत्याही गोष्टीची अवश्यकता पडल्या वांचून ती उत्पन्न करण्याविषयी तो कधी प्रयत्न करीत नाही. मग ती अवश्यकता शरीराच्या संबंधाची असो, किंवा मनाच्या संबंधाची असो मनुष्यात बोलण्याची शक्ति दिलेली आहे. हिच्या योगानें त्याच्या स्थितीस एका प्रकारें विशेष महत्व