Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२४ ) प्राणी तर उपजतांच आपले अन्न मिळवू लागतात. पण आतां मनुष्याचे पहा कसे आहे ते. तो जन्मास येतो तेव्हां सर्व प्रकारें पंगू ह्मणजे आपल्या खाण्या- पिण्याविषयीं आणि शीतोष्णादिकांच्या ताराशंसून अ- पले रक्षण करण्याविषयी आपल्या आईबापांवर किंवा दुसऱ्या कोणत्यातरी पालन करणाऱ्यांवर अलंबून असतो, अ.णि त्या स्थितीत त्याला कितीएक वर्षेपर्यंत राहावे लागतें. असा हा मनुष्यपाणी स्वतः मूळचा अगदी असमर्थ, अशक्त, उवडा आणि स्वतःचे हित करण्याविषयीं अगढ़ीं पंगू असतां, आपल्या एका बुद्धिबलाच्या योगानें इतर सर्व प्राण्यांचा आणि जगांतल्या सर्वे अचे तन पदार्थांचा घनी होऊन बसला आहे. हत्ती, वाव, सिंह हे प्राणी त्याच्यापेक्षा पुष्कळपट बळकट आहेत तरी तो त्यांस घरून आपण इच्छेपागावयास ल वितो. ह्या बापड्याला पंख नाहीत, तरी आकाशामध्ये फार उंच उडणाऱ्या पक्ष्यांस घरून आगून तो आवणजवळ ठेवितो. समुद्राच्या खोल पाण्यात त्यावें राहणें नाहीं; तरी तेथील ज्या वस्तु त्याच्या सुखास लागतात, त्या तो आणून घेतो. शीतोष्णाच्या तापाचे निवारण कर- प्यास त्यांच्या अंगावर कैंस, लोकर, किंवा पंख नाहीत; तरी, त्याला तुझी पाहिजे त्या प्रकारच्या हवेंत ठेवा; तेथे मुखावह होतील अशी व आपणास तयार करून घेऊन तो तेथें सुखाने राहतो. आकाशात उडणारे पक्षी, खोल पाण्यात पोहणारे मासे, पृथ्वीच्या पोटांतले नाना प्रकारचे पदार्थ इत्यादि ज्या वस्तु त्याच्या सुखास