Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गायन करीत बसळा. त्याचा तो स्वर ऐकतांच पुन्हां तोच मृग त्याच्या मांडीवर येऊन निजला. त्याच्या गळ्यांत ती किनरी होतीच. तानसेनाने ती सोडून घेतली व घरचा मार्ग सुधारला. घरीं येतांच त्यानें तें स्त्रीचे शिरकमल आपल्या मांडीवर घेतले व किनरीवर गाणे ह्मणण्यास सुरवात केली. सुस्वर स्वर कानांत पडतांच ती स्त्री शुद्धीवर भाली व ह्मणाली- ' आतां तरी माझी किनरी आणा. तानसेनाने ती तिच्या हातांत दिली तेव्हां, तिला आपल्या नवण्याचे मोठे कौतुक वाटले. धन्य तो तानसेन की, ज्याने दनचरांसही मोहित केलें ! - काव्यनीति. >0:0:0 सोमदंती राजा वनांत मिल्लाच्या जाळ्यांत सांप डला. त्यावेळी त्याची स्त्री मिल्लास निरर्थक प्राण घेत- श्याने अगर पातकें केल्यानें यमराजा कोणास कसा दंड करतो ते सांगत आहे. श्लोक. द्विजजन मुनि गाई तापसी ब्रह्मचारी इति गुरुनर साधु स्वामि देवी पुजारी वधिति जिव असे जे जाचणी भीम त्यांसी करितिल यम कोपें आयके घोर कैसी १