Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२९ ) जी एकदां अज्ञानामुळे याा घमेंडी झालेली असते तिचा तरी नाश होतो का तेही नहीं प्रसिद्ध कवी व्यंकटाध्वरीयांनी एके ठिकाणी झटले आहे:- लोक 'मंदाक्रांता' वेदव्यास: सइह दशयो वेद वेदाक्षराणि श्लोक त्वेकं परिपठतियः स स्वयंजीव एव | आपस्तंब: सइह कुरुते सम्यगोपासनं यः | कष्टं शिष्ट क्षति कृति कलौ कार्य मृच्छंति विद्या ॥ १ ॥ • अशी सांप्रत सर्व स्थिती झाली आहे. मग विद्येचें खरें महत्व लोकांना कळले, असे कसें ह्मणतां येईल ? अगाध विद्यादेवीची भेट ४|६ वर्षांमध्ये कशी होईल. त्याला तपाची तपेंच घालविली पाहिजेत; विद्यादेवीच्या मंदिरांत ज्याचा प्रवेशच झाल नाही त्याला तिचें खरें सौंदर्य पाहून होणारा आनंद कसा उत्पन्न होईल ? मित्रहो ! शुद्धीवर या, नोकरीच्या इच्छेनें फक्त आठ दहा वर्षे तिच्या सेवेत घालविणाऱ्या विद्यादेवी आपले खरे स्वरूप कधीहि दाखविणार नाही हे पके लक्षांत ठेवा. आणि जन्म असेपर्यंत विद्यादेवीची सेवा करणे हेंच आपके मुख्य कर्तव्य आहे, अशी आपल्या मनाशी पकी गांठ बांधून उद्योगात लागा ह्मणजे विद्यादेवी तुमची उपेक्षा करणार नाहीं. केवळ परिक्षेच्या इच्छेनें विद्यार्जन करणारा, व फक्त ज्ञानप्राप्तीची इच्छा घरून विद्यार्जन करणारा यांच्यामध्ये महदंतर आहे. पहिला फक्त आपल्या मस्तकावरचे ओझें उतरावें ह्मणून मेह- नत करील. पण दुसरा असे भाड्याचे काम करणार नाही तर विद्यार्जन करणे हेच आपलें मुख्य कर्तव्य