Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२८ ) आहे काय या सहाव्या यत्तेमध्यें ! आमी मरमर भेलों पण सांप्रत सात रुपड्यांची सुद्धां पंचाईत पडते आहे. कशाला ठेवतां इकडें? घालाना इंग्रेजी शाळेमध्ये ! फार नाही झाले तरी दोन च्यार इंग्रेजी इयत्ता केल्या की, पंधरा वीस रुपये गिरणी मध्ये तयार आहेत" झालें ! गुरुजीबुवांच्या सदरहू उपदेशाने त्या मुलाच्या द्रव्य लोभी पाळकाच्या जिव्हेला पाणी सुटलेंच? मग तो बिच्यारा मुङगा जो सहावि इयत्ता शिकल्याने कुठें म हाराष्ट्र भाषा मंदिराच्या दरवाज्याशी जाऊन पोचणार होता तो, तो मार्गच सोडून इकडे ऑग्ल भाषामंदिरा कडे जाण्याच्या ए. बी. सी. डी. रूपमार्ग चालूं लागतो. या मार्गाने दोन चार इयत्तारूपमैल चालून गेला नाहीं, तोच त्याचे पालक त्याच्या गळ्यांत पार- तंत्र्यरूप रुपेरी बेडी अडकवून देतात, किं विचारा होतकरू मुलगा पडला तेथेंच अडकून. हरहर ! अशा एक घड ना माराभर चिंध्या एकत्र केल्या ह्मणून त्यांना वस्त्राचे महत्व येईल काय ? ज्या गृहस्थाला विद्यामंदिराचे लांबूनहि सौंदर्य दृष्टीस पडलें नाहीं त्याला प्रत्यक्ष विद्यादेवीची भेट घ्यावी अशी कशी इच्छा उत्पन्न होईल ? अर्थात् वरप्रमाणे ज्याचे अध्य- आहे त्या विद्येपासून होणारा खरा आनंद नसल्यामुळे त्याची व ग्रंथांची लवकरच ताटातुट होते. आणि मग विद्यादेवीकडे जाण्याचे जे कांहीं मार्ग याला ठाऊक झालेले असतात तेहि वर्ष सहा महिन्यांत आठवत नाहीसे होतात. बरें अशा तऱ्हेनें हा सर्वस्वी धुवून निघाला तरी विद्याध्ययन केल्याची . ●