Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्च १९०१ लोकमित्र. विद्या. ( शार्दूल विक्रीडित.) रक्षाया जननीच जी हितकरी ताता परी सर्वदा । खेदा दर करोनियाँ रमविते कांता जशी भोगदा || लक्ष्मी वाढवुनी सदा पसरवी सत्कीर्ति स्वर्गादिकां । विद्या रूप हि काय काय नच दे ! चिंतामणी-मालिका ॥ १ ॥ सुभाषित ( स्त्र. टी.) • सन्मित्रहो ! -या स्थिरचर पदार्थांनी युक्त अशा पृथ्वीचे स्वामित्व जे आज आपल्या मानव कोटीजवळ आहे, त्याचे वास्तविक कारण शोधून काढण्याचा तुझीं कधीतरी प्रयत्न केला आहे काय? जर केला असेल तर विद्येचें खरें महत्वंहि तेव्हांच तुमच्या लक्षांत येऊन चुकलें असेल. पण किती दुःखाची गोष्ट की, अर्से विद्येचें खरें महत्व समजलेले सत्पुरुष या आर्यावर्तीवर फारच विरळा सांपडतात; किंबहुना हमारी एकहि सांपडत नाही असे ह्यटळे तरी चालेल. दुर्दैव आमचें ? बाई भरत भूमिके ! कायतरी तुझी चमत्कारीक स्थिति ही !! ज्या तुझ्या पोटीं वसिष्ठ वाल्मीकादि विद्वत् उत्पन्न झाल्या- मुळे जी तूं सरस्वती मंदीर या नावाने सर्वत्र प्रसिद्ध होतीस, त्याच तुजवर निर्विध वृंद वाढल्यामुळे आज