Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) ही गोष्ट आपल्या प्रिय पत्नीस केव्हां सांगेन असे त्यास होऊन गेलें होतें. इकडे त्याची स्त्री दररोजच्याप्रमाणे सकाळी जागीं होऊन पहाते तर आपला नवरा नाहीं व आवडती किनरीही नाहीं. मग काय विचारतां ? ती एक सारखी घळवळ रडूं लागली. आपल्या नवण्यानें ती किनरी खास कोणाला तरी देऊन टाकली अशी तिची खात्री झाली. किनरी नाहीशी झालेली पाहून तिच्या मनाला चैन पडेना. 'माझी किनरी आणा-माझी किनरी भाणा ' याप्रमाणे ती बडबडूं लागली. तानसेनाची स्वारी घरी आली. आपल्या प्रियप- त्नीची ही स्थिति त्याच्याने पहाववेना. आपल्या नवन्यास आणि तोही किनरी शिवाय आलेला पाहून तिला वाईट वाटलें. ती ह्मणाली-' चला ! अगोदर माझी किनरी आणा आणि नंतर माझ्याजवळ या. त्रिया ! ती किनरी हाणजे मी माझ्या जिवापलीकडे मानीत होते हें आपणासही ठाऊक आहे. आज तुझी माझा प्राण घ्यायला बसला काय ? माझी किनरी आणा-माझी किनरी आणा. तिभाषण ऐकतांच तानसेनाप वाईट वाटलें. अरण्यांत घडलेली सर्व हकीगत त्याने तिला सांगून ती किनरी आतां मिळण्याजोगी नाहीं भर्से ही तो ह्मणाला. तेव्हां ती मुछत होऊन भूमीवर पडली. तानसेनानें पुष्कळ प्रयत्न केले पण ती कांही केल्या शुद्धीवर येईना. अगदर्दी निरुपाय होतांच घरी एक सरसाधारण बीन होते ते घेऊन तानसेन पुन्हां अरण्यांत पूर्वस्थळीं