( ११४ ) " तेव्हां असा हा स्वप्नाचा प्रकार कसा? असा प्रश्न साहजिकच उद्भवतो! पण त्याला समाधानार्थी उत्तर देणें ही गोष्ट अशक्य आहे. कांही प्रयोगानें दुसऱ्या- वर स्वप्नप्रयोग करता येतो असेंही आढळून येतें. हरिश्चंद्रानें स्वप्नांत राज्यदान दिले ही गोष्ट विश्वामि- त्राचे कृतीनेच झाली असा उल्लेख आहे. विश्वामित्रानेंच कांहीं प्रयोग करून हरिश्चंद्राकरवीं स्वप्नांत राज्यदान स्वतःस करवून घेतले. ही गोष्ट पुराणांतरीची आहे. परंतु सध्या कांहीं असे प्रयोग अवलोकनांत येतात कीं, एखाद्या मनुष्यास दृश्यजगांतून अदृश्यजगांत पाठवितां येतें ! ह्मणजे एखाद्या मनुष्यावर प्रयोग करून त्याला भों- वतालचे परिस्थितीपासून दूर-कांहीं वेळ मोकळे करतां येतें व त्या दरम्यान त्याजवर स्वप्नासारखाच प्रयोग करतां येतो. या कृतीला “ मेस्मेराईझ " करणे असे ह्मणतात. विद्युत्प्रयोगानें एखाद्या मनुष्याला क्षणभर परिस्थितीचा विसर पाडतां येतो. त्याचप्रमाणे त्याच्या ज्ञानचक्षुपुढें कांहीं देखावही उत्पन्न करतां येण्याची प्रयोगसिद्धता साध्य झालेली आहे. स्वप्नांतील दृष्टांताप्रमाणेच हुबे- हुब गोष्टी मेस्मेराई केलेल्या मनुष्याम दिसतात व त्या स्थितीत अज्ञातस्थितीही त्यास ज्ञान होतें. हा विचार स्वतंत्र आहे व विषयही स्वतंत्र आहे. परंतु अशा प्रकारचे विद्युताचा संबंध तर स्वप्नाचे बुडाशीं नसेल असा संषय येतो. 66 स्वप्नांचे कारणांचा शोध कधीं लागेल तो लागो ! सध्यां अशा अशा गोष्टी घडून येतात असें-इतकेंच ह्मणण्याचे आमचे हाती आहे. तेव्हां एका जर्मन प्रोफे-
पान:लोकमित्र १९००.pdf/११४
Appearance