( ११२ ) ७०५४ ही नाहींशी झाली, असे असतां त्या म्पॅनेजरला एके दिवशीं स्वप्न पडले त्यांत त्याला त्या चोरीचा सुगावा लागला. त्याला स्वप्नांत जो प्रकार दिसला तो येणेप्रमा आपण-शहरी गेलों असून तेथे एका मित्राबरोबर फिरावयायास गेलो. तेथें त्या मित्राचा एक मित्र आप- गास भेटला. तेथे थोडावेळ सभाषण झाल्यावर त्या मित्राचे घरी गेलों. तो मित्र पूर्वाश्रमीचा विपत्तीग्रस्त व निर्धन असून कांही दिवसांपूर्वी एकाएकी श्रीमंत झाला होता. ही बातमी समजल्यावर बँकेतील चोरीची गोष्ट निघाली. त्याबरोबर त्या मित्राचा चहरा उतरला आणि तो तेथून निघून गेला. त्या घराचा नंबर-होता " दूसरे दिवशीं जागा झाल्यावर त्या गतम्यॅनेजरास स्वशां तील गोष्टीचें आश्चर्य वाटले, परंतु स्वप्नांतील दृष्टांतांचे सत्यासत्यतेबद्दल कांहीं शोध करावा असे मनांत येऊन तो त्या शहरास गेला. तेथें स्वप्नांतील दृष्टांताप्रमाणे सर्व चमत्कार त्याचे अवलोकनांत आले. नंतर रीतिप्रमाणे चौकशी झाली. चौकशीअंतीं चोरीचा तपास लागल. आणि स्वप्न खरें झालें. ज्या दिवशी हे स्वप्न पाहिले त्या दिवशी आपले मनांत चोरीसंबंधाचे विचार बिल- कूल नव्हते असे तो गृहस्थ प्रतिज्ञेवर सांगतो. 1 दुसरा एक प्रकार असा आढळून येतो कीं, भावी अनर्थसूचक स्वर्भे पडून त्यांतील दृष्टांताप्रमाणे हुबेहुब गोष्टी घडून येतात. अमूक अमूक गोष्ट पुढे अशी घडून येणार हे स्वप्नांत दिसून येते आणि खरोखरी तशा गोष्टी घडून येतात. अशा गोष्टी कांहीं प्रसिद्ध झालेल्या आहेत.
पान:लोकमित्र १९००.pdf/११३
Appearance