( ११२ ) स्वप्नांतील गोष्टींच्यायोगानें फायदा झाल्याची उदा- हरणे पुष्कळ घडून येतात. स्वप्नांवर जरी आमच्या लोकांचा विश्वास आहे व शुभाऽशुभाबद्दल जरी नेहमी आह्मी स्वप्नासंबंधानें विशेष काळजी वहातों-त्यांची किंमत मानतों-तरी खरोखरी स्वप्नांतील दृष्टांतांपासून •आपले शुभाशुभ कितपत घडून आले वगैरेचा दाखला ठेवण्याची आमच्यांत वहिवाट नाहीं स्वप्नासंबंधानें प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, त्याप्रमाणे प्रत्येकाची मतेंही वेगवेगळी असतील. त्या सर्वांचा जर एके ठिकाणी संग्रह होईल तर स्वतंत्रपणे या विषयावर विचार करणाऱ्याला पुरेशी सामुग्री मिळेल ! असो. स्वप्नांतील दाखले प्रत्यक्ष घडून आल्याची उदा- हरणे पुष्कळ सांगण्यांत येतील परंतु त्यांतल्या- त्यांत पुढील प्रकार विशेष हृदयंगम व चमत्कारिक दिसून येतील. एके वेळी एक बँकमध्ये बऱ्याचशा रकमेची चोरी झाली. कायद्याप्रमाणे बँकेचे ग्यॅनेजरवर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारी बरहुकुम त्याला घरण्यांत आलें. पोलीस वगैरे निष्णांत मंडळीनी शिकस्त केली तथापि चोरीचा मुद्देमाल लागला नाहीं. मी मी ह्मणविणाऱ्या गुप्त पॉलिसांपैकी हुशार लोकांचेही अवसान गळून गेलें. शेवट चोरीचा तपास लागत नाहीं अमें ठरून ती गोष्ट मार्गे पडली. म्यॆनेजराला आपल्या जागेचा राजी- नामा द्यावा लागला आणि त्याप्रमाणे म्यॅनेजराने ती नोकरी सोडून दुसऱ्या एका बँकेचा आश्रय घरला. या गोष्टीला बराच काळ लोटला. चोरीची गोष्ट स्मरणांतून-
पान:लोकमित्र १९००.pdf/११२
Appearance