( ११० ) अपरिचित अशा गोष्टी ज्या स्वप्नांत दिसून येतात त्या काय ह्मणून? मनांत घोळत असलेले विचार दृष्टां- तांत दिसतात ही गोष्ट जशी खरी आहे तशीच कधीं- कधीं अगदी अपरीचित आणि अदृष्टपूर्व असे चमत्का रही स्वप्नांत दिसतात ही गोष्टही खरी आहे. सबब " मनीं वसे तें स्वप्नीं दिसे " ही स्वप्नांची व्याख्या सार्वत्रिक लागू पडत नाहीं. स्वप्नांसंबंधानें आजपर्यंत पुष्कळांनी विचार केले आहेत. आणि अनुभवानें स्वप्नांसंबंधानें कांही ठोकताळे ठरविलेले आहेत. स्वप्नांतील गोष्टीं कधीं कधीं प्रत्ययास येतात. त्या प्रत्ययांचें धोरण ठरवून स्वप्नविचार वगैरे ठरविलेले आहेत आणि " कावळा बसायला व फांदी मोडायला " एक गांठ पडली ह्मणजे ठोकताळे खरे असल्याचें दिसून येतें–वाटतें. परंतु असा अनुभव फारच क्वचित येतो. कधीं कधीं स्वप्न पडलें यापलिकडे स्वप्नां- संबंधानें विशेष कांहीं स्मृति रहात नाहीं. तेव्हां त्या प्रसंगी अशा ठोकताळ्यांची सांगड कशी घालतां यईल ! शिवाय दुसरी एक गोष्ट अशी आहे कीं, स्वप्ने सररहा कांही अपेक्षेचीच पडतात असा नियम नाहीं. कांहीतरी दृष्टांत दृग्गोचर होतो इतकेंच. कधी कधी अर्धवटच गोष्टी दिसून येतात. स्वप्नासंबंधानें, पुनः, अमूक एक वेळ असते असाही नियम नाहीं. एखादे प्रसंगी पूर्व- 'रात्री स्वप्ने पडतात तर कधीं उत्तररात्रींही पडतात ! प्रथम गाढ झोप लागल्यावर मग मनाचा अस्वस्थपणा कोटून उरतो! मनाचा-मेंदूचा अथवा कांही दृश्य वस्तूं- •चा संबंध असावा असें ह्मणावे तर प्रथम मन आणि
पान:लोकमित्र १९००.pdf/११०
Appearance