धरली. ती वेळ अगदी पहाटेची होती. वारा संथपगें वहात होता व पुष्पांचा परिमल दशदिशांस फांकल्यामुळे त्या सुगंधमय होऊन गेल्या होत्या. पक्षांचा किल् किलाट नुक्काच सुरु झाला होता. अशा त्या रम्य वेळी तानसेन अरण्यांतील एका झाडाखाली बसून किनरीवर मनोहर आलाप काढू लागला. त्याचा तो मधुर स्त्रर या सर्व अरण्यांत लागला होता. तो एका मृगानें ऐकला. त्याचे तात्काळ चित्त वेधले व मृग तो तो स्वर जेथून निघत होता तेथे अर्थात तानसेनासन्निध आला. त्याची तितक्या अंतरावर राहूनही इच्छा पूर्ण होईना. त्याचे मन त्या गाण्याने अगदर्दी मोहून गेलें. तो तानसे- नाच्या मांडीवर निर्धास्तपणे मान टाकून झोंपी गेला. ही गोष्ट तानसेनासही माहीत नव्हती. - पुढे गाणे संपल्यावर तो पाहतो तर मांडीवर मृग- छावा निजलेला. त्याला मोठें आश्चर्य वाटलें. आपल्या गाण्याचें काय ते आज सार्थक झाले असेंही तो हाणा- ला. माझ्या गाण्यापेक्षां या किनरीच्या सुस्वर स्वरावर हा हरीण विशेष मुला तेव्हां याला ही वस्तुत्र देऊन टाकावी असा त्याने विचार करून तो अमलांतही भाणला. त्याने लगेच ती किनरी हरिणाचे गळ्यांत अडकावली. तेव्हां तो हरीण जागा होऊन पहातो तर हा मनुष्य. त्याच्या मनांत तेव्हांच मीति उत्पन्न झाली व तो तेथून निसटून दूर अरण्यांत निघून गेला. तानसेनाची स्वारी आनंदानें डुळत डुलत घराकडे निघाली. आपल्या गाण्यावर मृग लुब्ध होऊन गेला
पान:लोकमित्र १९००.pdf/११
Appearance