मी वृद्धांस लेकरासारखा, तरुण स्त्रीपुरुषांस प्राणापेक्षाही प्रियमित्रासारखा व लहान बालकांस घरांतील वडील माणसासारखा होतों, व जो मी सर्वांस सारखा प्रिय झालो होतो तोन मी एकाकी ग्रह फिर- स्यामुळे असा दीनासारखा पडून राहिलों व घर फिरले की वांसेही फिरतात या ह्मणीप्रमाणे कोणी माझ्याकडे इंकून देखील पाहिनात. अस्तु. मी पूर्वी बादशहाजवळ असतां त्याची मजवरची मेहेर नजर पाहून जे कोणी माझा हेवा करीत त्यांस माझे नुकसान करण्यास संधिच मिळाली नाहीं परंतु आतां मात्र मळा दुःख देण्याकरितां ते डोळ्यांत तेल घालून बसले होते. परंतु माझे नष्टचर्य सरत आले ह्मणा अगर त्यांचे ओढवले ह्मणा त्यांच्या कृत्यास यश ह्मणून येऊंच नये. इतक्यांत मराठे व बादशहा यांचे युद्ध जुंपले. मग काय पुसतां ? आतां सर्वांची खोडकी चांगली निरावेण्यास हीच संवि उत्तम असे पाहून मी मराठ्यांच मिळालो. मी मुख्य हुद्देदारास लायकीचे सरटिफिकिट ह्मणून माझी पुरातनची सनद दाखविली. माझ्या मागून माझी इतर मित्र मंडळी सर्व इकडेसच भरली. ह्याप्रमागें मी बादशहाशीं व दरबार- ध्या सरदारांशी वैर बांधिले असतां ईश्वरास माझी कृति पसंत पडली नाहीं. त्याने मला तेथून जें उचलिलें तें एका गवाळेणिच्या स्वाधीन केलें. "आपण चिंतितों एक परमेश्वर चिंती अनेक" ह्याप्रमाणे माझे मनचे विचार भागचेजागी विरमून गेले. माझ्या सर्व आशांचा भंग झाल्यामुळे पुढे कोणत्याही प्रकारें उत्साह मला
पान:लोकमित्र १९००.pdf/१०५
Appearance