Jump to content

पान:लोकमित्र १९००.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०३ ) 66 असेल, परंतु मी शपथ वाहून सांगतों कीं, तसा मुळींच प्रकार नव्हता. मला मशिदीमधून तसेच हिंदूच्या पवित्र देवालयांतून जाण्याची मनाई नसे. ह्याप्रमाणे मी बरेच दिवस मजेत घालावले व थोड्याच काळांत त्या देशाचे सर्व कोनेकोपरे मी पाहून आलों. मी स्वभावतःच स्वतं- त्रताप्रिय असल्यामुळे मला " परवशता तिखट सुरी उरीं बोचूं लागे. " मीं दुर्दैवाने एका थेरड्याचे हाती लागलों, त्याने माझ्या पळून जाण्याचे भीतीने अंधार कोठडीत कोंडून ठेविलें. तेथें पाहतो तो माझ्यासारखे आणखीं बरेच अभागी तोच बंदिवास भोगीत होते. दुःखांत सुख एवढेंच कीं, त्याने आह्मांस रोज सकाळ संध्याकाळ मोजून बाहेर काढावें व आमची हजीरी घेऊन पुनः आह्मांस मोजून आंत कोंडावें. अशा रीतीनें बरेच दिवस आह्मीं तेथें काढले. इतक्यांत ईश्वरास आमची दया येऊन त्याने त्या साताऱ्याकडे मृत्युरूपी दूत पाठवून आमच्या या हालांतून आह्मांस मुक्तं कर- विलें. मी तेथून एकदांचा मुक्त झालों खरा; परंतु माझे दुर्दैव हात धुवून पाठीस लागले होते. मी प्रथम एका वाण्याचे घरी नौकरीस राहिलों. तेथून सुटल्यावर मी एका माळ्याकडे राहिलों. येथें माझे दिवस बरेच सुखानें गेले. पुढे त्याने मला एका पुराणिकाला देऊन टाकिलें. मला सर्व प्रकारच्या भाषा येत होत्या; त्यामुळे कोणी माझ्याविषयीं कांहीं बोलले तर ते मला चांगले समजत असे. परंतु मी पूर्वीपासूनच आपल्या देशी भाषेखेरीज दुसरी भाषा बोलावयाची नाहीं असा निश्चय केला होता. व हा माझी निश्चय माझे फार कामी पडला. कारण