( १०२) धरून हांसलों. तो ह्मणाला " काय सांगू तुला या रूप- याची गम्मत ! आपल्यासारख्यापेक्षां हे निर्जीव पदार्थ बरे? यानें जीं जीं अघटित कृत्यें केलीं आहेत तशीं कृत्ये एखाद्या अरेरावाच्या हातूनही होणार नाहींत. " असे आणखीही तो कांहीं बोलला. होतां होतां मला त्याच्या बोलण्याचा कंटाळा येऊं लागला. त्याचें तें च- व्हाट केव्हां संपेलसें मला झालें. शेवटी त्यास हुं हुं ह्मणतां ह्मणतां मला झोप लागली. इतक्यांत मला थोडासा चित्तभ्रम होऊन स्वप्न पडलें. मला वाटले कीं तो रुपया उभा राहून व रुप्याच्या नादासारख्या खणखणीत मधुर स्वराने आपले सर्व वृत्त सांगता झाला. - तो ह्मणाला - " मी मूळ मिसर देशांत जन्मलों. मी लहान असतांच त्या देशावर मुसलमान लोकांनी स्वारी करून तो देश पादाक्रांत करून टाकिला. त्यांनी तेथें जीं जी' अनन्वित कृत्ये केली आहेत ती माझ्याच्यानें सांगवत नाहीत. त्यांनी गांवत्रींगांवें उद्वस्त करून टाकली. माझे आईबापांस, जातभाईस सर्वांस गुलाम करून हिंदु- स्थानांत आणिलें तेव्हां कर्मधर्म संयोगानें मला ही सुवर्ण- भूमेि पाहावी लागली. आतां मी आपला पूर्वीचा मिश्री पेहराव सोडून देऊन मुसलमानी बाणा घरिला. माझ्या- वर अकबर बादशहाची फार कृपा असे. त्याने मला एक सनदही करून दिली होती. ही सनद मिळाल्यावर तर मुसलमानी राज्यांत वाटेल तिकडे फिरण्याची मला मुमा मिळाली. मी मुसलमानी पेहेराव वगैरे केला; त्या प्रमाणेच मी धर्मांतरही केले असेल असे कोणास वाटले
पान:लोकमित्र १९००.pdf/१०२
Appearance