( १० ) एकलें. तेव्हां त्याच्या मनांत तानसेनाविषयी पूज्यभाव उत्पन्न झाला. तो त्याच्या गाण्यावर भारी लुब्ध झाला. त्या गंधर्वश्रेष्टास आपल्याही अंगचा कांहीं गुण दाख- वावा असे वाटल्यावरून त्यानें तानसेनाच्या भावाजा बरहुकूम आवाज काढणारी एक किनरी तयार केली, ती त्यानें तानसेनास बक्षीस दिली. पुढे तानसेन हीच किनरी घेऊन प्रातःकाळी गार्णे ह्मणूं लागला. त्यावेळचे त्याचे ते गाणे ऐकून कोणास बरें मोहिनी पडणार नाहीं ? तो आतां गाणार ह्मणजे त्या ठिकाणी लोकांचे थव्याचे थवे जमत. त्याची स्त्री तर इतकी मोहून जाई की, ती त्याच्या मांडीवर स्वस्थ झोपून राही. तिला झोंप लागतांच तानसेन आपच्या हातांतील किनरी ठेवी व स्त्रीस त्रास होईल ह्मणून गाणेही बंद करी. त्याच्या स्त्रीने त्या कीनरीवर फारच मन बसले. ती स्त्री ती किनरी नित्य पुसून स्वच्छ करी. तिच्यावर गवसणी घालून, व ती नीट सांभाळून आपल्या पेटीत ठेवत असे. विशेष कारणावांचून ती ते हत्यार तानसेनाच्या हातांत कधीच देत नव्हती. कारण तें तो कोणाला तरी ब्रह्मानंदांत मग्न झाल्यावर देऊन टाकीळ अशी तिला भीति होती व तानसेन तसा होता ही. तो गाण्या- च्या अगदीं भरांत आला ह्मणजे आपल्याकडील हवी ती वस्तु लोकांस देऊन टाकी. त्याला तेव्हा तिची किंमतच वाटत नसे. असो- - एकेदिवशीं तानसेनास काय लहर आली नकळे. त्यानें ती किनरी कार्खेत मारिली व भरण्याची घाट
पान:लोकमित्र १९००.pdf/१०
Appearance