पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ वकील व त्यांची मते १०५ ू नका. त्यांच्या कृत्याविषयी किंवा लेखाविषयी मी सहानुभूति दाखवीन असे बिलकुल समजू " या प्रसंगाला अनुलक्षून पुढे दिलेले टिळकांचे सर जॉन सायमन याना पत्र व त्यानी टिळकाना दिलेले उत्तर ही वाचावी म्हणजे त्यांचे खरे मर्भ वाचकांच्या लक्षात येईल. खटल्याचा निकाल झाल्यावर सर जॉन सायमन यांचे आभार मानण्या- करिता टिळकानी त्यांना एक पत्र ता. ५ मार्च १९१९ रोजी लिहिले. त्यात ते लिहितात " आपण माझे काम फार लक्ष लावून मेहनतीने केले याबद्दल मी आपला ऋणी आहे. दुसरा कोणी असता तरी अधिक काय करता? आपण केवळ वकील या नात्याने मजकरिता उभे राहिलात. आपल्या व माझ्या राजकीय मतात ऐक्य नाही. आपण ही गोष्ट कोर्टापुढे सांगितली व मलााहे ती पटलेली आहे. आपली इच्छा अशी असल्याचे कळते की या खटल्याची हकीकत देताना आपण प्रधानमंडळात होता किंवा प्रिव्हीकौन्सिलर आहात या गोष्टीचा उल्लेख होऊ नये. ठीक आहे. माझ्या हाती ही गोष्ट आहे तोपर्यंत तसा उल्लेख होणार नाही हे निश्चित समजा. 35 त्यावर सर जॉन सायमन यानी टिळकाना खालीलप्रमाणे उत्तर पाठविले. लंडन ६ मार्च १९९९ " तुम्ही जे खाजगी पत्र मला पाठविले ते मिळाले व तशाच मनोभावनेने मी हे उत्तर लिहीत आहे. तुम्ही ही केस हरलात तथापि वकील या नात्याने मी जी खटपट केली तिजविषयी तुम्ही समाधान व्यक्त केलेत हे पाहून मला बरे वाटले. तुमचा खटला माझे हातात आला तेव्हा तो यशस्वी करण्यास बन्याच अडचणी येणार हे मला दिसून आलेच होते. व म्हणून शक्य तितक्या काळजीपूर्वक मी तुमचे काम केले. वकील या नात्याने जरी मी तुमची केस चालवली तरी त्याचा माझ्या स्वतःच्या राजकीय मताशी काहीहि संबंध नाही असेच तुम्ही मानता हे वाचून मला बरे वाटले. व जितक्या विश्वासाने तुम्ही ही गोष्ट मला कळवली तितक्याच विश्वासाने मी तिचा अंगिकार करतो.

"या खटल्याच्या निकालाने व्यक्तिशः तुमची व तुमच्या मित्रमंडळीची मोठी निराशा झाली असेल. पण एकंदरीने ह्याचा परिणाम सनदशीर मार्गावरच हिंदुस्थानची प्रगति चालावी असा झाल्यास ते काही वाईट नाही. माँटेग्यू आणि व्हाइसरॉय यानी ज्या सुधारणा नुकत्याच सुचविल्या आहेत त्यांचे अभिनंदन करून सर्व पक्षाच्या व मताच्या लोकांनी त्या स्वीकारण्यास पुढे यावे अशाच त्या आहेत.

33 या पत्रव्यवहारासंबंधी दोन शब्द लिहिणे अवश्य आहे. वास्तविक सर जॉन सायमन यानी टिळकाना तुमचा माझा संबंध अमुकच आहे असे बजावणे गैर होते. सर जॉन सायमन हे कोण आहेत ही गोष्ट टिळकानीच जाहीर केल्यामुळे प्रसिद्ध होणार असे थोडेच होते! ज्याला सायमन साहेबांचे नांव ऐकून माहित त्याला