पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" ८६ लो० टिळकांचे चरित्र भाग ४ नाही. " त्यावर सैनिक म्हणाला " अरे तुझी तुतारी ही तरवारीपेक्षाहि अधिक वाईट! कारण तू तुतारी वाजवून आमच्या शत्रूना हुरूप आणली नसतीस तर ते आमच्यावर तुटून पडले नसते." तोच न्याय येथे लागू करण्यासारखा आहे. रँडसाहे- बानी घटकाभर समजा जुलूम तरी केला होता. पण जॅकसन साहेबानी काय केले होते? 'काळ व राष्ट्रमत' ह्या वर्तमानपत्रांचा केसरीबरोबर कान्हेरे याने उल्लेख केला होता. पैकी 'काळ' व 'राष्ट्रमत' ही दोन पत्रे प्रत्यक्ष टिळकांची नव्हती तरी त्या पत्राशी व त्यांच्या संपादकाशी त्यांचा मोठा स्नेहसंबंध होता ह्याचा पुरावा आला आहे. अर्थात त्या दोन पत्रानाहि ती टिळकांची असे पर्यायाने म्हटले यात काय चूक? कान्हेरे फाशी गेला व टिळकाना फक्त राजद्रोहाची शिक्षा झाली. यावरून सर जॉन सायमन हे फरक दाखवू इच्छितात. बरोबरच आहे. प्रत्यक्ष खुनाचा खटला करण्याला जो पुरावा लागतो तो सरकारपाशी नव्हता. मग ते खुनाचा खटला कसा भरणार? पण खुनाच्या साथीदारीचे प्रकार निरनि- राळे असतात. 'ऑलिव्हर ट्विस्ट' नामक कादंबरीत 'फेगन' नावाच्या मनुष्याने चौर्यकर्म शिकविण्याची शाळा काढल्याची गोष्ट आहे ती तुम्ही जाणताच. फेगन याचा एक शिष्य फेनियन याने प्रत्यक्ष चोरी केली खरी आणि त्याला चोरीबद्दल शिक्षा झाली. पण त्याच्या गुरूलाहि ती शिक्षा व्हावयाला नको होती काय? टिळक हे खुनी लोकांचे तुतारीवाले होते. अर्थात त्यांच्या हाती तुतारीच होती. तरवार नव्हती. आणि चिरोल साहेबानीहि जवळजवळ तसेच म्हटले आहे. पण मी बोललो हे माझे मत झाले हो. तुम्हाला काय वाटेल ते ठरवावयाला तुम्ही मुख- त्यार आहा. कान्हेन्याच्या खटल्यात तुम्हीच न्याय देण्याला बसला असता व त्याचा जबाब तुम्ही वाचला असता तर तुम्ही काय अनुमान काढले असते? असो. बेअब्रूचे हे असे मुद्दे आहेत. पुढे आलेल्या लेखांचा अर्थ ठरविणे हे काम तुमचे आहे. तसेच पुस्तकातील विषय सार्वजनिक महत्त्वाचा आहे की नाही व त्यात केलेली टीका रास्त आहे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवावे. अशा रीतीने हा खटला आता बहुतेक संपला. सायमन साहेबानी ह्या खटल्याकडे साम्राज्या- तील लोकांचे लक्ष आहे असे सांगितले आणि ते खरेहि आहे. मीहि तेच म्हणतो. कारण परिणामाच्या दृष्टीने पाहता इतका महत्त्वाचा खटला आजवर माझेपुढे आला नव्हता. तुम्ही खोटा निकाल किंवा मनाला न पटणारा निकाल द्यावा असे कोणीहि म्हणणार नाही. पण टिळकांच्या तर्फे निकाल देण्याला लागणारे धैर्य अंगी आणा असे सायमन साहेब तुम्हाला सांगतात! याचा अर्थ प्रतिकूल निकाल देण्याला लागणारे धैर्य तुमच्या अंगी नाही! पण हे खरे आहे काय? कारण तुम्हाला टिळकाना जसा न्याय द्यावयास पाहिजे तसाच ब्रिटिश लोकानाहि तो द्यावयाला पाहिजे. तात्पर्य तुमच्या अंगी धैर्य हवे पण ते आपले कर्तव्य बरोबर बजावण्याचे हवे. आपले कर्तव्य टाळून खुषामत करणे याला धैर्य म्हणत नाहीत. सायमन साहेबानी फ्रान्समध्ये शांतता परिषदेच्या वेळी टळलेल्या अत्याचारांचा नुक-